घरासमोरून लांबवली दुचाकी; नांदुरा शहरातील घटना

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी लांबवल्याची घटना नांदुरा शहरातील वॉर्ड क्रमांक 17 मध्ये समोर आली आहे. या प्रकरणी मोहमद नावेद अब्दुल हमीद (38) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.9 फेब्रुवारीला रात्री 11.30 वा. स्वतःचे मेडिकल दुकान बंद करून त्यांनी हिरो होंडा दुचाकी (क्र एमएच 28 एएम 1905) घरासमोर …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी लांबवल्याची घटना नांदुरा शहरातील वॉर्ड क्रमांक 17 मध्ये समोर आली आहे. या प्रकरणी मोहमद नावेद अब्दुल हमीद (38) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
9 फेब्रुवारीला रात्री 11.30 वा. स्वतःचे मेडिकल दुकान बंद करून त्यांनी हिरो होंडा दुचाकी (क्र एमएच 28 एएम 1905) घरासमोर उभी केली होती. दुसर्‍या दिवशी सकाळी 6 ला नमाज पडण्यासाठी उठून ते मशिदीकडे निघाले असता घरासमोर दुचाकी दिसली नाही. त्यांनी घरातील लोकांना व आजूबाजूच्या लोकांना विचारपूस केली. परिसरात शोध घेतला. मात्र मोटारसायकल मिळून आली नाही. 30 हजार रुपयांची मोटारसायकल कुणीतरी चोरून नेल्याची तक्रार त्यांनी पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.