घरासमोरून लांबवली मोटारसायकल!; जळगाव जामोद तालुक्‍यातील घटना

जळगाव जामोद (मकसूद शेख ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आसलगाव (ता. जळगाव जामोद) येथे घरासमोरून एकाची मोटारसायकल चोरट्याने लांबवली. ही घटना 1 जूनच्या पहाटे समोर आली. काल, 2 जूनला या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. संदीप सुनिल भावसार (31, रा. आसलगाव) हे दांडगे पेट्रोलपंपावर मजुरी करतात. त्यांच्याकडे हिरो स्प्लेंडर प्रो सील्वर मोटारसायकल …
 

जळगाव जामोद (मकसूद शेख ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः आसलगाव (ता. जळगाव जामोद) येथे घरासमोरून एकाची मोटारसायकल चोरट्याने लांबवली. ही घटना 1 जूनच्‍या पहाटे समोर आली. काल, 2 जूनला या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली.

संदीप सुनिल भावसार (31, रा. आसलगाव) हे दांडगे पेट्रोलपंपावर मजुरी करतात. त्‍यांच्‍याकडे हिरो स्प्लेंडर प्रो सील्वर मोटारसायकल (MH28 AE 5217) होती. 31 मेच्‍या रात्री 11 ला मोटारसायकल घरासमोर त्‍यांनी उभी केली होती. 1 जूनच्‍या पहाटे त्‍यांच्‍या आईने सकाळी दरवाजा उघडला असता घरासमोर मोटारसायकल दिसली नाही. आईने संदीप यांना मोटारसायकल दिसत नसल्याचे सांगितल्याने त्‍यांनी शोधाशोध सुरू केली. जळगाव जामोद, धानोरा, खांडवी भागात आजपर्यंत शोध घेतला पण मोटारसायकल मिळून आली नाही. अखेर 15 हजार रुपयांची मोटारसायकल चोरीस गेल्याची तक्रार त्‍यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.