घर दुमजली, पण नाव पीएम आवास योजनेत!; देऊळगाव राजातील धक्‍कादायक प्रकार

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पक्की, दुमजली घरे असणाऱ्यांचीही नावे देऊळगाव राजा नगरपालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत असल्याने खळबळ उडाली आहे. यादीत नगरसेवकांचे नातेवाइक, शासकीय कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी तसेच एकाच कुटूंबातील तीन व्यक्तींचाही समावेश आढळला आहे. यामुळे शहरातील खरे लाभार्थी मात्र वंचित राहिले आहेत. शिवसंग्राम संघटनेने ही बाब चव्हाट्यावर आणली …
 

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पक्‍की, दुमजली घरे असणाऱ्यांचीही नावे देऊळगाव राजा नगरपालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्‍या लाभार्थ्यांच्‍या यादीत असल्याने खळबळ उडाली आहे. यादीत नगरसेवकांचे नातेवाइक, शासकीय कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी तसेच एकाच कुटूंबातील तीन व्यक्तींचाही समावेश आढळला आहे.

यामुळे शहरातील खरे लाभार्थी मात्र वंचित राहिले आहेत. शिवसंग्राम संघटनेने ही बाब चव्‍हाट्यावर आणली असून, संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेश इंगळे, जहीर खान पठाण, अमजत पठाण यांनी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे देऊळगाव राजा येथे आले असताना त्‍यांना भेटून निवेदन देत हा प्रकार सांगितला. या प्रकरणात दोषी असलेल्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. पालकमंत्र्यांनी त्‍यांना कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.