घर फोडून चोरट्यांनी लांबवले सोने!; नांदुरा तालुक्‍यातील घटना

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेहू येथे 23फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 2.00 वाजेदरम्यान चोरट्यांनी घर फोडून 47 हजार रुपयांचे सोने चोरून नेले. सौ. प्रमिला गजानन मुंढे ( 30, रा. सावरगाव नेहू) यांनी नांदुरा पोलीस स्टेशनला चोरीची तक्रार केली आहे. एक अंगठी, 7 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, 10 …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेहू येथे 23फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 2.00 वाजेदरम्यान चोरट्यांनी घर फोडून 47 हजार रुपयांचे सोने चोरून नेले.

सौ. प्रमिला गजानन मुंढे ( 30, रा. सावरगाव नेहू) यांनी नांदुरा पोलीस स्टेशनला चोरीची तक्रार केली आहे. एक अंगठी, 7 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, 10 ग्रम सोन्याची पोत, चांदीचे जोडवे असे एकूण 47 रुपयांचे दागिने घरातील पेटीमधून चोरी गेल्याचे त्‍यांनी तक्रारीत म्‍हटले आहे. पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्‍हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.