घर फोडून दागिन्यांवर डल्ला, खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घर फोडून चोरट्यांनी दागिन्यांसह ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना लासुरा जहाँगिर (ता. खामगाव) येथे काल, २५ जुलैला पहाटे समोर आली. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बाळू जगदेव तायडे (५२) हे मजुरी करतात. त्यांना दोन मुले, दोन मुली आहेत. त्यांना घरकुल …
 
घर फोडून दागिन्यांवर डल्ला, खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घर फोडून चोरट्यांनी दागिन्यांसह ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना लासुरा जहाँगिर (ता. खामगाव) येथे काल, २५ जुलैला पहाटे समोर आली. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

बाळू जगदेव तायडे (५२) हे मजुरी करतात. त्‍यांना दोन मुले, दोन मुली आहेत. त्‍यांना घरकुल भेटले असून, बाजूलाच त्‍यांचे जुने घर आहे. जुन्या घराला कडीकोयंडा लावून ते नवीन घरात झोपतात. मात्र जुन्या घरात दागदागिने आणि घरातील भांडे ठेवलेले होते. लोखंडी कोठीतील लहान डब्यात दागिने ठेवलेले होते. दोन्ही मुली, जावई मंगेश रावसाहेब वानखडे (रा. आंबेटाकळी), दोन्ही मुले व पत्नी असे सर्व जण २५ जुलैला रात्री साडेदहाला जेवण करून झोपी गेले.

२५ जुलैला पहाटे साडेतीनला मोठा मुलगा सतीश कामावर जाण्यासाठी उठला. त्‍याने जुन्या घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्‍न केला असता उघडला नाही. खिडकी तुटलेली दिसली. त्‍याने सर्वांना उठवून घरात चोरी झाल्याचे सांगितले. घरात पाहणी केली असता सोन्याचे एक पदक, ५४ सोन्याचे मनी, सोन्याचे शिंपले मनी, सोन्याची पोत, एक कुकर, पितळी भांडे असा एकूण ३६ हजार रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला. तायडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्‍हा दाखल करून तपास सुरू केला आहे.