चप्पल-मोबाइल एका विहिरीवर काढून दुसऱ्याच विहिरीत महिलेची आत्‍महत्‍या; मेहकर तालुक्‍यातील खळबळजनक घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेहकर तालुक्यातील शिवणीपिसा येथील महिला बेपत्ता झाल्याची तक्रार 2 मार्चला मेहकर ठाण्यात देण्यात आली होती. काल 6 मार्चला शिवारातीलच एका विहिरीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे एका विहिरीच्या काठावर तिने चप्पल आणि मोबाइल काढून ठेवली होता. आत्महत्या मात्र दुसऱ्याच विहिरीत केली. शिवणी पिसा येथील स्वाती अशोक पिसे (28) …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मेहकर तालुक्यातील शिवणीपिसा येथील महिला बेपत्ता झाल्याची तक्रार 2 मार्चला मेहकर ठाण्यात देण्यात आली होती. काल 6 मार्चला शिवारातीलच एका विहिरीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्‍हणजे एका विहिरीच्‍या काठावर तिने चप्पल आणि मोबाइल काढून ठेवली होता. आत्‍महत्‍या मात्र दुसऱ्याच विहिरीत केली.

शिवणी पिसा येथील स्वाती अशोक पिसे (28) ही महिला 2 मार्च रोजी शेतात जाते म्हणून घरून निघून गेली होती. मात्र त्याच दिवशी दुपारी गावशिवारातील एका विहिरीच्या काठावर तिचा मोबाइल आणि चप्पल आढळली होती. त्यामुळे विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली असावी, असे वाटत होते. त्यामुळे गावकऱ्यांनी विहिरीत शोध घेतला.विहिरीला पाणी भरपूर असल्याने मोटार पंप लावून पाणी उपसले मात्र महिला विहिरीत आढळली नाही. त्यामुळे त्याचदिवशी रात्री विवाहिता बेपत्ता झाल्याची तक्रार मेहकर पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. मात्र काल 6 मार्च रोजी तिचा मृतदेह हा त्याच शिवारातील शेजारील दुसऱ्या विहिरीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृतक महिलेला 7 वर्षाचा अर्पित आणि 3 वर्षाची जानवी अशी अपत्ये आहेत.दोघांनाही मातृप्रेमाला मुकावे लागले आहे. महिलेच्या आत्महत्येचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही. तपास मेहकर पोलीस करीत आहेत.