चला पुन्हा सरपंच आरक्षणाच्या हालचालींना वेग… जानेवारीअखेरीस होणार फैसला! पाठोपाठ महिला आरक्षण

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह) ः रात्रंदिवस काथ्याकूट, चर्चा-बैठकांचे सत्र आणि अखेरीस सरपंच आरक्षण जाहीर… त्यादृष्टीने गावागावात अनेकांची तयारी सुरू झाली; पण अचानक एकाएकी मंत्र्यांनी आरक्षण रद्द केल्याची घोषणा केली अन् सर्वांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले. निवडणुकांनंतर आरक्षण काढण्याचे ठरवल्यानुसार आता पुन्हा एकदा सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीच्या हालचालींना वेग आला आहे. जानेवारी अखेरीस सर्व संवर्गातील …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह) ः रात्रंदिवस काथ्याकूट, चर्चा-बैठकांचे सत्र आणि अखेरीस सरपंच आरक्षण जाहीर… त्यादृष्टीने गावागावात अनेकांची तयारी सुरू झाली; पण अचानक एकाएकी मंत्र्यांनी आरक्षण रद्द केल्याची घोषणा केली अन् सर्वांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले. निवडणुकांनंतर आरक्षण काढण्याचे ठरवल्यानुसार आता पुन्हा एकदा सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीच्या हालचालींना वेग आला आहे.

जानेवारी अखेरीस सर्व संवर्गातील आरक्षण 13 तहसीलमध्ये काढण्यात येणार आहे. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात 50 टक्के महिला आरक्षण निर्धारित करण्यात येणार आहे. 870 चे निघणार आरक्षण दरम्यान, सध्या 527 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या असल्या तरी जिल्ह्यातील 870 सरपंच पदाचे आरक्षण निघणार आहे. यामधील 415 पदे खुल्या, 235 पदे ओबीसी, 170 पदे अनुसूचित जाती तर 50 पदे अनुसूचित जमातीकरिता आरक्षित राहणार आहे. यापूर्वी काढण्यात आलेले आरक्षण रद्द करून निकालानंतर सोडत काढण्याचे आदेश ग्रामविकास मंत्र्यांनी दिले होते. त्यामुळे आता नव्याने आरक्षण काढण्यात येत आहे. आरक्षण 13 तहसीलमध्ये काढण्यात येणार आहे.