चहा घेऊन परत येईपर्यंत हॉटेलसमोरून मोटारसायकल गायब!; चिखलीच्‍या मेहकर फाट्यावरील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः हॉटेलच्या बाहेर मोटारसायकल उभी करून चहा घेणे एकाला महागात पडले. चहा घेऊन परत येईपर्यंत चोरट्यांनी मोटारसायकल गायब केली. मेहकर फाट्यावर काल, 4 एप्रिलला दुपारी 2 ते 2:30 दरम्यान हा प्रकार घडला. चिखलीतील पुंडलिकनगरात राहणारे रवी भगत (39)भालगाव (ता. चिखली) येथे त्यांच्या मूळ गावी गेले होते. तिथून परतत असताना दुपारी 2 …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः हॉटेलच्या बाहेर मोटारसायकल उभी करून चहा घेणे एकाला महागात पडले. चहा घेऊन परत येईपर्यंत चोरट्यांनी मोटारसायकल गायब केली. मेहकर फाट्यावर काल, 4 एप्रिलला दुपारी 2 ते 2:30 दरम्यान हा प्रकार घडला.

चिखलीतील पुंडलिकनगरात राहणारे रवी भगत (39)भालगाव (ता. चिखली) येथे त्यांच्या मूळ गावी गेले होते. तिथून परतत असताना दुपारी 2 वाजता मेहकर फाट्यावर त्यांना त्यांचा मित्र भेटला. चहा पिण्यासाठी ते थांबले. मेहकर फाट्यावरील हॉटेल सुयोगच्या बाहेर त्यांनी मोटारसायकल उभी केली. चहा घेण्यासाठी हॉटेलमध्ये गेले. 2:30 वाजता बाहेर आले तेव्हा त्यांची दुचाकी गायब झालेली दिसली. हिरो कंपनीची एमएच 28 बीएच 5286 या क्रमांकाची दुचाकी चोरट्याने चोरल्याची तक्रार त्यांनी चिखली शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.