चहा पिणे पडले महागात… अवघ्या ५ मिनिटांत दुचाकी गायब!; बुलडाण्याच्‍या जांभरूण रोडवरील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत अाहेत. आज, २७ जुलैला भरदुपारी जांभरून रोडवरून दुचाकी चोरीस गेली. मयूर रामेश्वर पवार (२१ रा. अंभोडा ता. बुलडाणा) हा बुलडाण्यात पीक फवारणीचे औषध खरेदीसाठी आला होता. दुपारी पावणेचारच्या सुमारास तो जांभरून रोडवरील एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेला. त्याने दुचाकी (MH 28 A4428) हॉटेलच्या बाहेर …
 
चहा पिणे पडले महागात… अवघ्या ५ मिनिटांत दुचाकी गायब!; बुलडाण्याच्‍या जांभरूण रोडवरील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्‍या घटना दिवसेंदिवस वाढत अाहेत. आज, २७ जुलैला भरदुपारी जांभरून रोडवरून दुचाकी चोरीस गेली.

मयूर रामेश्वर पवार (२१ रा. अंभोडा ता. बुलडाणा) हा बुलडाण्यात पीक फवारणीचे औषध खरेदीसाठी आला होता. दुपारी पावणेचारच्या सुमारास तो जांभरून रोडवरील एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेला. त्याने दुचाकी (MH 28 A4428) हॉटेलच्या बाहेर ठेवली होती. पाच मिनिटानंतर तो हॉटेलच्या बाहेर आला असता दुचाकी गायब झाली होती. परिसरात शोध घेऊनही ती मिळून आली नाही. त्‍यामुळे त्‍याने शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली.