चांडोळच्या सरपंचपदी सुनील महेर; प्रथमच मुस्लिम महिला उपसरपंच

चांडोळ (प्रमोद गायकवाड) ः सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर चांडोळ सरपंचपदी कोणाची वर्णी लागेल, याची उत्सुकता ग्रामस्थांना लागली होती. आज, 10 फेब्रुवारीला झालेल्या निवडणुकीत सुनिल देवसिंग महेर यांनी सरपंचपदी तर उपसरपंच पदासाठी प्रथमच मुस्लिम महिला फैमिदा बी लालखा पठाण यांची निवड झाली.सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी सर्व साधारण प्रवर्गाच्या एकूण दोन उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यात ग्रामविकास …
 

चांडोळ (प्रमोद गायकवाड) ः सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर चांडोळ सरपंचपदी कोणाची वर्णी लागेल, याची उत्सुकता ग्रामस्थांना लागली होती. आज, 10 फेब्रुवारीला झालेल्या निवडणुकीत सुनिल देवसिंग महेर यांनी सरपंचपदी तर उपसरपंच पदासाठी प्रथमच मुस्लिम महिला फैमिदा बी लालखा पठाण यांची निवड झाली.
सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी सर्व साधारण प्रवर्गाच्या एकूण दोन उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यात ग्रामविकास आघाडी पॅनलतर्फे सरपंपदासाठी सुनिल महेर तर उपसरपंच पदासाठी फैमिदा बी यांचे अर्ज भरले होते. तर ग्रामविकास पॅनलकडून सरपंच पदासाठी देवकन्या धनावात तर उपसरपंच पदासाठी नलिनी जंजाळ यांनी अर्ज दाखल केले होते. त्यात सरपंच पदाच्या निवडणुकीत सुनिल महेर यांनी तर उपसरपंच पदासाठी फैमिदा पठाण नियुक्त झाले. सरपंच व उपसरपंच पदासाठी प्रत्येकी दोन – दोन अर्ज आले होते. सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया गुप्त मतदानाने पूर्ण झाली. त्यात विजयी सरपंच व उपसरपंच यांना प्रत्येकी नऊ – नऊ मते मिळाली. त्यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.