चाकू दाखवून लुटणाऱ्यास २४ तासांत पकडले, खामगाव शहर पोलिसांची कामगिरी

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : काल, १९ जुलैला दुपारी खामगाव शहरातील नांदुरा रोडवर खेळणे विक्रेत्याला २२ वर्षीय तरुणाने चाकू दाखवून लुटले होते. या प्रकरणी खामगाव शहर पोलिसांत तक्रार दाखल होताच तातडीने तपासचक्रे फिरवत अवघ्या २४ तासांत लुटणाऱ्याला अटक करण्यात आली. आज, २० जुलैला पहाटेच रोहिणखेड (ता. मोताळा) येथून मोहम्मद दानिश शेख अकिल …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : काल, १९ जुलैला दुपारी खामगाव शहरातील नांदुरा रोडवर खेळणे विक्रेत्‍याला २२ वर्षीय तरुणाने चाकू दाखवून लुटले होते. या प्रकरणी खामगाव शहर पोलिसांत तक्रार दाखल होताच तातडीने तपासचक्रे फिरवत अवघ्या २४ तासांत लुटणाऱ्याला अटक करण्यात आली. आज, २० जुलैला पहाटेच रोहिणखेड (ता. मोताळा) येथून मोहम्मद दानिश शेख अकिल याच्‍या मुसक्‍या आवळण्यात आल्या.

मोहम्मद दानिश शेख अकिलने काल दुपारी अडीचच्या सुमारास खेळणी विक्रेत्याला लुटले होते. विक्रेत्याकडून जबरीने १७ हजार ५०० रुपये हिसकावले होते. याबद्दलची तक्रार विक्रेत्याने शहर पोलीस ठाण्यात दिली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व गुन्ह्याच्या वेळी वापरलेल्या मोटारसायकल क्रमाकांच्या आधारे लुटारू रोहिणखेड येथील असल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी रोहिणखेड येथे जाऊन त्याच्या मुसक्या आवळल्या. त्‍याच्‍याविरुद्ध बुलडाणा व औरंगाबाद जिल्ह्यातही फसवणुकीचे विविध गुन्हे दाखल आहेत.

बँकेत येणाऱ्या वृद्ध महिला आणि पुरुषांनाही तो पैसे मोजून द्यायच्या बहाण्याने गंडवायचा. ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव), उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनिल अंबुलकर, डीबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरिक्षक गौरव सराग, पोहेकाँ गजानन बोरसे, नापोकाँ सुरज राठोड, पोकाँ दीपक राठोड, पोकाँ प्रफुल्ल टेकाळे, पोकाँ जितेश हिवाळे, पोकाँ अमरदिपसिंह ठाकूर, पोकाँ अनंत डुकरे यांनी केली.