चाणक्‍य, आरआर ट्रॅव्‍हल्समधून कोरोनाचा प्रसार!; दोन बसेसना 20 हजारांचा दंड; बुलडाण्यात कारवाई

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाविषयक नियम न पाळता प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या दोन खासगी ट्रॅव्हल्सना बुलडाणा शहरात 20 हजार रुपये दंड करण्यात आला आहे. चाणक्य आणि आरआर ट्रॅव्हल्सच्या या बसेस आहेत. ही कारवाई बुलडाणा शहर पोलीस व नगरपालिकेने शहर पोलीस ठाण्यासमोर काल, 22 मेच्या रात्री आणि आज, 23 मेच्या सकाळी केली. मलकापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या चाणक्य …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाविषयक नियम न पाळता प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या दोन खासगी ट्रॅव्‍हल्सना बुलडाणा शहरात 20 हजार रुपये दंड करण्यात आला आहे. चाणक्‍य आणि आरआर ट्रॅव्‍हल्‍सच्‍या या बसेस आहेत. ही कारवाई बुलडाणा शहर पोलीस व नगरपालिकेने शहर पोलीस ठाण्यासमोर काल, 22 मेच्‍या रात्री आणि आज, 23 मेच्‍या सकाळी केली.

मलकापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या चाणक्य ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये (क्र.एमएच 29 बीई 3131) 38 प्रवासी होते. काल रात्री 9:30 वाजता शहर पोलीस ठाण्यासमोर या गाडीला अडवले असता प्रवाशांकडे आरटीपीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्र नव्हते. तसेच केवळ अत्यावश्यक कारणासाठी 15 प्रवाशांना घेऊनच प्रवास करण्याची मुभा आहे. तरीही बसमध्ये 38 प्रवासी दिसले. त्‍यामुळे कारवाई करत 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

दुसरी कारवाई आज, 23 मेच्‍या सकाळी 7 वाजता करण्यात आली. आरआर ट्रॅव्हल्स या कंपनीची लक्झरी बस  (क्र. जीजे 14 वाय 5409) सुरतवरून मेहकरकडे जात असताना शहर पोलीस ठाण्यासमोर बस अडवली असता बसमध्ये 9 ते 10 प्रवाशी होते. यापैकी कुणाकडेही कोरोनाचे निगेटिव्ह अहवाल प्रमाणपत्र नसल्याने 10 हजार रुपयांचा दंड त्‍यालाही ठोठावण्यात आला.

जिल्हाबंदी नावालाच?

कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे राज्य शासनाने कठोर निर्बंधासह 30 मेपर्यंत जिल्हाबंदीचे आदेश दिले आहेत. केवळ अत्यावश्यक कारणासाठीच आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या सीमेवर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असताना जिल्ह्याच्या सीमेवर या ट्रॅव्हल्स वाहनांची तपासणी होत नाही का? असा प्रश्न  उपस्थित होत आहे.