चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेचा छळ; घराबाहेर हाकलले, लोणार पोलिसांनी केला पतीसह ९ जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृसेवा) ः चारित्र्यावर संशय घेऊन २५ वर्षीय विवाहितेचा पतीसह सासरच्यांनी छळ मांडला. मटनाचे दुकान टाकण्यासाठी एक लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी केली. मागणी मान्य होत नसल्याचे पाहून तिला चिमुकल्या मुलीसह घराबाहेर काढून दिले. विवाहितेने लोणार पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली असून, त्यावरून पोलिसांनी पतीसह सासरच्या ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. …
 

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृसेवा) ः चारित्र्यावर संशय घेऊन २५ वर्षीय विवाहितेचा पतीसह सासरच्यांनी छळ मांडला. मटनाचे दुकान टाकण्यासाठी एक लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी केली. मागणी मान्य होत नसल्याचे पाहून तिला चिमुकल्या मुलीसह घराबाहेर काढून दिले. विवाहितेने लोणार पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली असून, त्‍यावरून पोलिसांनी पतीसह सासरच्या ९ जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. तिचे सासर ठाणे येथील आहे.

नुसरत परवीन सादीक शेख हिला १०४ द्रोणागिरी आपार्टमेंट, गणेश चौक, किसननगर नं.३ ठाणे, ता.जि.ठाणे येथे दिलेले आहेत. ती सध्या माहेरी नवीनगरी लोणार येथे राहत आहे. तिचा पती मोहम्मत सादीक शेख रसूल शेख (२९) यांच्‍यासह नंदोई मो.अश्रफ अब्दुल रजाक, नणंद शहानुरबी शेख अश्रफ, मावस सासरा शेख शकील शेख शरीफ, मावस सासू सायराबी शे. शकील, मावस सासरा शेख अमिन शेख शरीफ, चुलत सासरा शे.अब्दुल शे.दाऊल, चुलत सासू हलीमाबी शे. अब्दुल, नणंद शमनबी शे.मोइन अशी गुन्‍हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तिचे लग्न मोहम्मत सादीक शेख रसूल याच्‍यासोबत १६ डिसेंबर २०१५ ला झाले होते. तिला आता एक तीन वर्षांची मुलगी आहे. पती नेहमी चारित्र्याव संशय घेऊन घरात उपाशीपोटी ठेवत होता. मर्जीनुसार हुंडा व सोने दिले नाही, असे सासरचे मंडळी छळ करत. मटनाचे दुकान टाकण्यासाठी एक लाख रुपयांची सासरच्यांनी सुरू केली. मागणी पूर्ण होत नसल्याने घराबाहेर काढून देण्यात आले, असे तक्रारीत म्‍हटले आहे.