चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेचा मांडला छळ, पतीसह सासरच्या 6 जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चारित्र्यावर संशय घेऊन सासरच्यांनी विवाहितेचा छळ मांडला. वारंवार होणाऱ्या मारहाणीला कंटाळून तिने माहेर गाठून आज, 13 एप्रिलला बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळीविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सौ. मयुरी विवेक पवार (रा. बिबी, ता. लोणार) या विवाहितेने पती विवेक परशराम …
 

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः चारित्र्यावर संशय घेऊन सासरच्यांनी विवाहितेचा छळ मांडला. वारंवार होणाऱ्या मारहाणीला कंटाळून तिने माहेर गाठून आज, 13 एप्रिलला बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळीविरुद्ध तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी 6 जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

सौ. मयुरी विवेक पवार (रा. बिबी, ता. लोणार) या विवाहितेने पती विवेक परशराम पवार, सासरा परशराम रेखाजी पवार, सासू सौ. मीनाक्षी, दीर शैलेश व स्‍वप्‍नील आणि जाऊ आरती शैलेश पवार यांच्‍याविरुद्ध तक्रार दिली. लग्‍न झाल्‍यानंतर काही दिवस चांगले वागविल्यानंतर सासरच्या मंडळींनी चारित्र्यावर संशय घेऊन छळायला सुरुवात केली. 25 नोव्‍हेंबर 2017 पासून 19 जानेवारी 2021 पर्यंत तिचा वारंवार छळ करण्यात आल्याचे तिने तक्रारीत म्‍हटले आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक श्री. जाधव करत आहेत.