चार चोरट्यांनी घर फोडले पण सीसीटीव्‍हीमुळे अडकले!; मलकापुरातील घटना

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चोरट्यांनी घर फोडले मात्र सीसीटीव्हीमुळे त्याची ओळख स्पष्ट झाली आणि ते अडकले आहेत. चौघांविरुद्ध घर फोडल्याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. ही घटना काल, 29 जूनला सकाळी रजतनगरात समोर आली. गोपाल रामेश्वर मालपाणी (57) हे मेडिकल चालक आहेत. ते शहराबाहेरील रजतनगरात राहतात. ते बहीण व भावाला भेटण्यासाठी 27 …
 
चार चोरट्यांनी घर फोडले पण सीसीटीव्‍हीमुळे अडकले!; मलकापुरातील घटना

मलकापूर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः चोरट्यांनी घर फोडले मात्र सीसीटीव्‍हीमुळे त्‍याची ओळख स्‍पष्ट झाली आणि ते अडकले आहेत. चौघांविरुद्ध घर फोडल्याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी गुन्‍हे दाखल केले आहेत. ही घटना काल, 29 जूनला सकाळी रजतनगरात समोर आली.

गोपाल रामेश्वर मालपाणी (57) हे मेडिकल चालक आहेत. ते शहराबाहेरील रजतनगरात राहतात. ते बहीण व भावाला भेटण्यासाठी 27 जूनला इंदौरला गेले होते. त्‍यांनी घराच्‍या रखवालीसाठी प्रल्हाद ठोसर याला सांगितले होते. काल पहाटे 4.30 वाजता त्‍यांचे मित्र संजय बाहेती यांनी त्‍यांना फोनव्दारे कळविले की, वॉचमन प्रल्हाद ठोसर घरी आलेला आहे. त्याने सांगितले की, तुमच्‍या घरी चोरी झाली. त्‍यामुळे गोपाल यांनी त्‍यांचे मोठे भाऊ मदन मालपाणी (रा. महेश सोसायटी, मलकापूर) यांना फोन करून रजतनगरला घरी पाठवले. ते स्‍वतः तातडीने कुटुंबासह मलकापूरला येण्यास निघाले. 11.30 वाजता ते मलकापूरला आले.

घराची पाहणी केली असता बेडरुममधील सामान अस्ताव्यस्‍त पडलेले दिसले. मुलगा अंकित व सून अंकिता मालपाणी यांच्‍या बेडरूममधील पर्समधील नगदी 3200 रुपये व आधारकार्डच्या झेराक्स प्रत चोरी गेल्याचे दिसले. पोलिसांनी पोलीस स्टेशनला आणलेला साक्षीदार संग्रामसिंग पंजाबसिंग बावरी (रा. म्हाडा कॉलनी) याने घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहून घरात चोरी करणारे सुरजसिंग ईश्वरिसंग बावरी, करतारसिंग भुर्मकसिंग झुन्नी, भगतसिंग उर्फ भक्त्या ईश्वरसिंग बावरी, रणजिससिंग झुन्नी (सर्व रा. म्हाडा कॉलनी, मलकापूर) असल्याचे सांगितल्याने. त्‍यामुळे पोलिसांनी या चौघांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. तपास मलकापूर शहर पोलीस करत आहेत.