चार दिवसांत जिल्ह्यातून १४ बेपत्ता!; सहा तरुणी, सहा महिला, दोन पुरुषांचा समावेश

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तरुणी, महिला बेपत्ता होण्याचे सत्र जिल्ह्यात कायम आहे. गेल्या चार दिवसांत आणखी सहा तरुणी, सहा महिला, दोन पुरुष गायब झाले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने जिल्ह्यातून व्यक्ती हरवतात तरी पोलीस प्रशासनाकडून मात्र याबद्दल कोणताही खुलासा होत नसल्याने सामान्य मंडळीही अचंबित आहेत. आज, १६ जुलैला दिव्या ज्ञानेश्वर नायसे ही २० वर्षीय तरुणी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः तरुणी, महिला बेपत्ता होण्याचे सत्र जिल्ह्यात कायम आहे. गेल्या चार दिवसांत आणखी सहा तरुणी, सहा महिला, दोन पुरुष गायब झाले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने जिल्ह्यातून व्‍यक्‍ती हरवतात तरी पोलीस प्रशासनाकडून मात्र याबद्दल कोणताही खुलासा होत नसल्याने सामान्य मंडळीही अचंबित आहेत. आज, १६ जुलैला दिव्या ज्ञानेश्वर नायसे ही २० वर्षीय तरुणी शेगावमधून गायब झाली आहे. पांडे गल्लीत गढीजवळ ती राहत होती. ती हरवल्याची तक्रार शेगाव पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.

१५ जुलैला हे झाले बेपत्ता
काल, १५ जुलैला सौ. वनिता पुरुषोत्तम छित्रे (३५, रा मडाखेड, ता. जळगाव जामाेद, पोलीस ठाणे जळगाव जामोद), दिपाली फत्तेसिंग पाटील (३१, रा. खलसे प्‍लॉट, राऊतवाडी, चिखली, पोलीस ठाणे चिखली), भारती राम काचोले (३०, रा. पुंडलिकनगर, चिखली, पोलीस ठाणे चिखली), सौ. दुर्गा शिरिषकुमार कदम (३२, रा. पोलीस ठाणे वसाहतीमागे, चिखली, पोलीस ठाणे चिखली) या महिला तरुणी बेपत्ता झाल्या आहेत.

१४ जुलैचे बेपत्ता…
सौ. नुरजाना आरीफ सुरत्‍ने (३१, रा. आलेवाडी, ता. संग्रामपूर, पोलीस ठाणे सोनाळा), राहुल नारायण तेलंग (४२, रा. शिवशंकरनगर, पिंपळगाव राजा, ता. खामगाव, पोलीस ठाणे पिंपळगाव राजा), निर्मला गणेश धनवटे (३५, साखरखेर्डा, ता. सिंदखेड राजा, पोलीस ठाणे साखरखेर्डा), आरती शेषराव बोंडे (१९, सोनाळा, ता. संग्रामपूर, पोलीस ठाणे सोनाळा).

१३ जुलैचे बेपत्ता…
उषाबाई भावलाल शिंदे (२४, रा. गोसिंग, ता. मोताळा, पोलीस ठाणे बोराखेडी)

१२ जुलैचे बेपत्ता…
सौ. पूजा संजय होले (२४, रा. शेलापूर खुर्द, ता. मोताळा पोलीस ठाणे बोराखेडी), प्रसाद शिवानंद औटे (२६, रा. रोहिणखेड, ता. मोताळा, पोलीस ठाणे धामणगाव बढे), मुक्‍ता बाबुराव डोसे (२३, पंचायत समिती जवळ शेगाव, पोलीस ठाणे शेगाव शहर), कोमल विजय सुरपाटणे (२१, रा. रोहिणखेड, ता. मोताळा, पोलीस ठाणे धामणगाव बढे).