चार वर्षीय चिमुरडीवर खामगावमध्ये लैंगिक अत्‍याचार; ३१ वर्षांच्‍या नराधमाला अटक

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लॉलीपॉप देण्याचे आमिष दाखवून ४ वर्षीय चिमुकलीला स्वतःच्या घरात नेत ३१ वर्षीय नराधमाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना खामगाव शहरातील शंकरनगरात काल, ३१ जुलैच्या दुपारी एकच्या सुमारास घडली. रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला लगेच अटक करण्यात आली. धम्मपाल शेषराव गवई (रा. शंकरनगर खामगाव) असे अटक केलेल्या …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लॉलीपॉप देण्याचे आमिष दाखवून ४ वर्षीय चिमुकलीला स्वतःच्‍या घरात नेत ३१ वर्षीय नराधमाने तिच्‍यावर लैंगिक अत्‍याचार केल्याची धक्‍कादायक घटना खामगाव शहरातील शंकरनगरात काल, ३१ जुलैच्‍या दुपारी एकच्‍या सुमारास घडली. रात्री उशिरा या प्रकरणी गुन्‍हा दाखल झाल्यानंतर आरोपीला लगेच अटक करण्यात आली.

धम्मपाल शेषराव गवई (रा. शंकरनगर खामगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. काल दुपारी पीडित चिमुकलीला चॉकलेट व लाॅलीपाॅप देतो घरी चल असे म्हणून गवई याने स्वतःच्‍या घरी नेले. तिथे तिच्‍यावर अत्‍याचार केला. पीडितेला त्रास होऊ लागल्याने आईने विचारणा केली असता तिने घडला प्रकार सांगितला. तिच्‍या आईने तिला घेऊन शहर पोलीस ठाणे गाठले. तिथे तिच्‍या आईने तक्रार दिल्यानंतर चिमुकलीची वैद्यकीय तपासणी होऊन धम्मपाल गवईविरुद्ध गुन्‍हा दाखल झाला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्‍याला लगेच अटक करण्यात आली. तपास पोलीस उपनिरिक्षक ईश्वर सोळंके करत आहेत.