चालकाचा ताबा सुटून लोणारजवळ उलटला ट्रक; सुदैवाने जिवीत हानी नाही

लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लोणार शहरापासून तीन किलोमीटर अंतरावरील शारा गावाजवळील वळण रस्त्यावर अचानक चालकाचा ताबा सुटून ट्रक उलटला. ही घटना आज, 17 एप्रिलला सकाळी सहाच्या सुमारास घडली.मालवाहू ट्रक (क्र. MH 43 U9928) सुलतानपूरकडून लोणारकडे येत होता. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या वळणावर चालू आठवड्यात हा दुसरा …
 

लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः लोणार शहरापासून तीन किलोमीटर अंतरावरील शारा गावाजवळील वळण रस्त्यावर अचानक चालकाचा ताबा सुटून ट्रक उलटला. ही घटना आज, 17 एप्रिलला सकाळी सहाच्‍या सुमारास घडली.
मालवाहू ट्रक (क्र. MH 43 U9928) सुलतानपूरकडून लोणारकडे येत होता. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या वळणावर चालू आठवड्यात हा दुसरा अपघात आहे. या वळणाजवळ दिशादर्शक फलक नाही, कठडे लावलेले नाहीत. त्‍यामुळे वारंवार अपघात होत असल्याचे दिसून येत आहे.