चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव कार झाडाला धडकली, 2 युवक जागीच ठार, 3 जण जखमी; खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव कार झाडावर आदळली. यात 2 जण जागीच ठार झाले तर तिघे जखमी झाले आहेत. ही घटना 4 मे रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास बोरी अडगाव – आंबेटाकळी रोडवर आंबेटाकळीपासून 1 किलोमीटर अंतरावर (ता.खामगाव) घडली. नितीन जनार्दन सुरवाडे (24, रा. बोरी अडगाव), राहुल बाबुराब सुरवाडे …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव कार झाडावर आदळली. यात 2 जण जागीच ठार झाले तर तिघे जखमी झाले आहेत. ही घटना 4 मे रोजी रात्री साडेनऊच्‍या सुमारास बोरी अडगाव – आंबेटाकळी रोडवर आंबेटाकळीपासून 1 किलोमीटर अंतरावर (ता.खामगाव) घडली.

नितीन जनार्दन सुरवाडे (24, रा. बोरी अडगाव), राहुल बाबुराब सुरवाडे (24, रा. बोरी अडगाव) अशी ठार झालेल्या युवकांची नावे आहेत, तर संदीप तानाजी सुरवाडे, रोशन राजकुमार सुरवाडे, मंगेश नारायण सुरवाडे जखमी झाले आहेत. त्‍यांच्‍यावर खामगावच्‍या सामान्य रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत. नानमुखाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते जेवणासाठी ढाब्‍यावर जात होते. गावापासून 1 किलोमीटरवर जात नाही तोच भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार झाडावर आदळली.