चिखलीचे व्‍यापारी श्वेताताईंना भेटले; त्‍यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले पत्र… निर्बंधाचा फेरविचार करा!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्रशासनाने लॉकडाऊन सदृश्य निर्बंध लावल्यामुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे. निर्बंधाचा फेरविचार करून मजूर, कामगार, व्यापारी, लघु उद्योजक, गॅरेज मालक, सलून, हॉटेल व्यावसायिक तसेच इतर छोट्या मोठ्या व्यवसायांवर अवलंबून असणाऱ्यांना दिलासा देण्याची मागणी आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे केली आहे. आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांची आज, …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः प्रशासनाने लॉकडाऊन सदृश्य निर्बंध लावल्यामुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे. निर्बंधाचा फेरविचार करून मजूर, कामगार, व्यापारी, लघु उद्योजक, गॅरेज मालक, सलून, हॉटेल व्यावसायिक तसेच इतर छोट्या मोठ्या व्यवसायांवर अवलंबून  असणाऱ्यांना दिलासा देण्याची मागणी आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे केली आहे.

आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांची आज, 6 एप्रिलला चिखली शहरातील व्यापाऱ्यांच्‍या शिष्टमंडळाने भेट घेऊन निर्बंध उठविण्याची मागणी केली. या मागणीच्या अनुषंगाने आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून यासंदर्भात निर्बंधाचा सर्व समावेशक फेरविचार करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने निर्बंध घालताना विविध क्षेत्रांचा विचार केलेला नाही. या निर्बंधाचा अनेक क्षेत्रांना मोठा फटका बसत असून, अर्थव्यवस्थाही यामुळे खिळखिळी होणार आहे. त्यामुळे रिटेलर्स, छोटे दुकानदार, छोटे हॉटेल्स, केश कर्तनालय अशा सर्व घटकांतील व्यावसायिक बेरोजगार होणार आहेत. ट्रान्सपोर्टेशन जरी खुली ठेवली असली तरी गॅरेज आणि स्पेअर पार्ट्‌स दुकाने मात्र बंद ठेवण्यात आल्याने वाहने नादुरुस्त झाल्यास स्पेअर पार्ट न मिळाल्याने व दुरुस्ती न झाल्याने ट्रान्सपोर्ट सुद्धा बंद राहणार आहे. हातावर पोट असणारे मजूर , दुकानांवर काम करणारे कामगार, बांधकाम क्षेत्रातील बांधकाम साहित्य पुरविणारे दुकाने बंद झाल्याने बांधकाम मजुरांची उपासमार होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे निर्बंध लावत असताना जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, व्यापारी, लघु व्यावसायिक तसेच छोट्या- छोट्या घटकांशी चर्चा करून निर्बंध लावण्याबाबत फेरविचार करून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याची सुद्धा त्यांनी मागणी केली आहे.