चिखलीच्या शेतकऱ्यांचे दुःख कृषिमंत्र्यांच्या कानावर!; आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी मांडल्‍या अनेक मागण्या

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांच्या कानावर घातल्या. या मागण्यांची पूर्तता लवकरात लवकर करावी, अशी आग्रही मागणीही केली. आज,१ सप्टेंबरला बुलडाणा जिल्हा पीक विम्यासंदर्भात भुसे यांनी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींची मंत्रालयात बैठक घेतली. बैठकीत आमदार सौ. महाले पाटील यांनी बुलडाणा जिल्हा तथा …
 
चिखलीच्या शेतकऱ्यांचे दुःख कृषिमंत्र्यांच्या कानावर!; आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी मांडल्‍या अनेक मागण्या

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांच्‍या कानावर घातल्या. या मागण्यांची पूर्तता लवकरात लवकर करावी, अशी आग्रही मागणीही केली.

आज,१ सप्‍टेंबरला बुलडाणा जिल्हा पीक विम्‍यासंदर्भात भुसे यांनी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींची मंत्रालयात बैठक घेतली. बैठकीत आमदार सौ. महाले पाटील यांनी बुलडाणा जिल्हा तथा चिखली विधानसभा मतदारसंघात असलेल्या विविध कृषी विभागाच्या समस्या सोडविण्यासाठी निवेदन दिले आहे. बैठकीला पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खासदार प्रतापराव जाधव, आमदार तथा माजी मंत्री डॉ. संजय कुटे, आ. ॲड. आकाश फुंडकर, आ. डॉ. संजय रायमूलकर, आ. संजय गायकवाड, आ. राजेश एकडे, कृषी सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी एस. राममूर्ती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक आदी उपस्‍थित होते.

चिखली तालुक्यात सन २०२०-२१ मध्ये नैसर्गिक आपत्तीत ११,९९६ शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. पैकी ६,५२० शेतकरी प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी झालेले होते. पीकविमा कंपनीने केवळ १२४८ शेतकऱ्यांना नुकसान भरपाईस पात्र ठरविले आहे. शासन निर्णयानुसार नैसर्गिक आपत्ती अंतर्गत ३३ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी असे असताना ही विमा काढलेल्या ६,५२० शेतकऱ्यांपैकी केवळ १२४८ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी पात्र ठरविले. उर्वरित अद्याप ५२७२ शेतकऱ्यांना विमा कंपनी कडून नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी केली आहे.

स्व. भाऊसाहेब फुंडकर योजनेचा निधी व लक्षांक वाढवून द्या
चिखली तालुक्यासाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन २०१९-२० अंतर्गत प्रथम, द्वितीय, तृतीय हफ्त्या पोटीचे अनुदान रक्कम रुपये ६५ लक्ष अद्याप प्रलंबित आहे. तसेच बुलडाणा तालुक्यासाठीचे अनुदान २३ लक्ष रुपये अद्याप प्रलंबित आहे. ते तात्काळ मिळावे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत लागवडीचे लक्षांक देण्यात आलेले नाही. हा लक्षांक वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचे असल्याचे आ. महाले पाटील यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

सामूहिक शेत तळे व यांत्रिकीकरण योजनेची व्याप्ती वाढवा
सामूहिक शेततळे या योजनेची शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने त्याचा लक्षांक देण्यात यावा, सोबतच राष्ट्रीय फलोत्पादन अभियान व कृषि यांत्रिकीकरण योजने अंतर्गत शेतकऱ्यांची २० एच.पी. लहान ट्रॅक्टर, पावर विडर व पावर टिलरची मागणी जास्त असल्याने लक्षांक वाढीव मिळावा. पोखरा योजने अंतर्गत डेस्क ७ वर प्रलंबित असलेले अद्याप अनुदान अदा न करण्यात चिखली तालुक्यातील ११० ४८.०६ लक्ष व बुलडाणा तालुक्यातील १३९ २४.०१ लक्ष इतके अनुदान येणे बाकी असल्याने तातडीने अनुदान देण्या बाबतची मागणी सुद्धा निवेदनात आ सौ श्वेताताई महाले यांनी केली आहे.

दुष्काळी अनुदान तातडीने द्या
गत्‌वर्षी संततधार पावसाने शेतपिकांचे अतोनात नुकसान झालेले होते तर यावर्षी कमी पावसाने पिके कुपोषित झालेले आहेत. जिल्ह्याची आणेवारी ५० पैशाच्या आत आलेली असतानाही दुष्काळी अनुदान अद्याप शेतकऱ्यांना दिलेले नाही. शेतकरी अगोदरच नैसर्गिक आपत्तीच्या माऱ्याने मेटाकुटीला आलेला आहे. अनेक शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालेले नाही. त्यामुळे दुष्काळी अनुदान तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी सुद्धा बैठकीत आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी केली आहे.