चिखलीच्‍या रेणुका देवीची यात्रा रद्द; गर्दी न करण्याचे संस्थानचे आवाहन

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि राष्ट्रीय आपत्तीच्या पार्श्वभूमीवर चिखली येथील श्री रेणुका देवीची यात्रा रद्द करण्यात आली आहे. संस्थानचे विश्वस्त व जिल्हा प्रशासनाने तसा निर्णय घेतला आहे. यात्रेसंदर्भात भाविकांनी कठोर निर्बध पाळत घरीच राहण्याचे व मंदिरात गर्दी न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.चैत्र पौणिमेच्या पर्वावर चिखली शहरात श्री रेणुका देवीची …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि राष्ट्रीय आपत्तीच्या पार्श्वभूमीवर चिखली येथील श्री रेणुका देवीची यात्रा रद्द करण्यात आली आहे. संस्‍थानचे विश्वस्त व जिल्हा प्रशासनाने तसा निर्णय घेतला आहे. यात्रेसंदर्भात भाविकांनी कठोर निर्बध पाळत घरीच राहण्याचे व मंदिरात गर्दी न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
चैत्र पौणिमेच्या पर्वावर चिखली शहरात श्री रेणुका देवीची यात्रा मोठ्या उत्साहात होत असते. मागील वर्षी सुद्धा कोरोना संकटामुळे ही यात्रा रद्द करण्यात आली होती. श्री रेणुका देवीच्या वहनाची नगर परिक्रमा हे यात्रेच्या आकर्षणाचे केंद्र असते. यावर्षी 27 एप्रिल रोजी होणारे चैत्र पौर्णिमेचे वहन मागील वर्षाप्रमाणे यंदाही होणार नाही. वहन मिरवणूक तसेच सोबतचे इतर सर्व जाहीर कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. 27 एप्रिल 2021 रोजी पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी 7 वाजता मंदिर प्रशासनातर्फे देवीची आरती करण्यात येईल.त्याचवेळी भाविकांनी आपल्या घरी देवीच्या प्रतिमेसमोर पूजा तसेच आरती करावी याचे प्रतिक म्हणून दारासमोर अंगणात 5 दिवे लावावेत. श्री रेणुका मातेकडे कोरोना विषाणू संकटाशी लढा देण्याची शक्ती दे अशी प्रार्थना करावी व नामस्मरण करावे, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.