चिखलीच्‍या हरिओमनगरातून मोटारसायकलची चोरी!; चोरटा दिसतोय सीसीटीव्‍हीत!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घरासमोरून दुचाकी चोरीस गेल्याची घटना चिखली शहरातील हरिओमनगरात काल, २२ जूनच्या सकाळी समोर आली. या प्रकरणी चिखली पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आज, २३ जूनला रामेश्वर उत्तमराव साळोख (५२) यांनी पोलिसांत तक्रार दिली की होंडा कंपनीची DREAM NEO मोटारसायकल (क्रमांक MH 28 AF …
 
चिखलीच्‍या हरिओमनगरातून मोटारसायकलची चोरी!; चोरटा दिसतोय सीसीटीव्‍हीत!

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः घरासमोरून दुचाकी चोरीस गेल्याची घटना चिखली शहरातील हरिओमनगरात काल, २२ जूनच्‍या सकाळी समोर आली. या प्रकरणी चिखली पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. चोरटा सीसीटीव्‍ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

आज, २३ जूनला रामेश्वर उत्तमराव साळोख (५२) यांनी पोलिसांत तक्रार दिली की होंडा कंपनीची DREAM NEO मोटारसायकल (क्रमांक MH 28 AF 1999) त्‍यांनी सन २०१३ मध्ये विकत घेतली होती. २१ जूनच्‍या रात्री त्‍यांनी घरासमोर मोटारसायकल लॉक करून उभी केली होती. २२ जूनला सकाळी उठून पाहिले असता मोटारसायकल गायब दिसली. मोटारसायकलचा परिसरात व चिखली शहरात शोध घेतला. मात्र मिळून आली नाही. आशीर्वाद ट्रेडर्सचे सीसीटीव्ही चेक केले असता अनोळखी व्‍यक्‍ती २२ जूनच्‍या पहाटे दीडच्‍या सुमारास मोटारसायकल चोरून नेताना दिसून आला. तपास चिखली पोलीस करत आहेत.