चिखलीतील युवकाचा कोरोनामुळे मृत्यू; दिवसभरात नवे 44 पॉझिटिव्ह रुग्ण

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 27 जानेवारीला कोरोनाने आणखी एक बळी घेतला असून, यामुळे जिल्ह्यात एकूण बळींचा आकडा 167 वर गेला आहे. उपचारादरम्यान संभाजीनगर, चिखली येथील 35 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दिवसरात नव्या 44 बाधितांची भर पडली आहे.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1709 अहवाल प्राप्त …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 27 जानेवारीला कोरोनाने आणखी एक बळी घेतला असून, यामुळे जिल्ह्यात एकूण बळींचा आकडा 167 वर गेला आहे. उपचारादरम्यान संभाजीनगर, चिखली येथील 35 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दिवसरात नव्या 44 बाधितांची भर पडली आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1709 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1625 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 44 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 40 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 4 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 1561 तर रॅपिड टेस्टमधील 64 अहवालांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेले अहवाल
चिखली शहर : 8, चिखली तालुका : अंत्री खेडेकर 1, मुंगसरी 1, चांधई 1, खामगाव तालुका : जळका भडंग 1, मेहकर शहर : 11, बुलडाणा शहर : 10, मोताळा तालुका : परडा 1, मोताळा शहर : 1, नांदुरा तालुका : अंभोडा 1, जवळा 1, संग्रामपूर तालुका : सोनाळा 1, देऊळगाव राजा शहर : 2, देऊळगाव राजा तालुका : देऊळगाव मही 2, जळगाव जामोद शहर : 1, मूळ पत्ता जाफराबाद जि. जालना येथील 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 44 रूग्ण आढळले आहे.
89 रुग्णांनी केली कोरोनावर मात
आज 89 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः बुलडाणा : 8, सिद्धीविनायक हॉस्पीटल 17, स्त्री रुग्णालय 5, अपंग विद्यालय 11, मलकापूर : 8, देऊळगाव राजा : 9, लोणार : 1, मेहकर : 2, खामगाव : 17, मोताळा : 3, चिखली : 8.
246 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत 105139 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 13332 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच 2072 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 13745 कोरोनाबाधित रुग्ण असून सध्या रुग्णालयात 246 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 167 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.