चिखलीतून आवळल्‍या दोन मोबाइलचोरांच्या मुसक्या!; ११ मोबाइल जप्‍त

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली शहरातून दोन अट्टल मोबाइल चोरट्यांच्या मुसक्या बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने (“एलसीबी’) आवळल्या आहेत. त्यांनी चोरलेले ११ मोबाइलही जप्त करण्यात आले आहेत. काल, २३ जुलैला रात्री ही कारवाई करण्यात आली. विशाल जायलवाल (रा. गवळीपुरा, चिखली) व शुभम नावकर (रा. राऊतवाडी, चिखली) पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. “एलसीबी’ने सायबर पोलिसांची मदत घेत …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली शहरातून दोन अट्टल मोबाइल चोरट्यांच्या मुसक्‍या बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेने (“एलसीबी’) आवळल्‍या आहेत. त्यांनी चोरलेले ११ मोबाइलही जप्त करण्यात आले आहेत. काल, २३ जुलैला रात्री ही कारवाई करण्यात आली.

विशाल जायलवाल (रा. गवळीपुरा, चिखली) व शुभम नावकर (रा. राऊतवाडी, चिखली) पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. “एलसीबी’ने सायबर पोलिसांची मदत घेत या गुन्हेगारांचा शोध घेतला. दोघांनाही त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ११ मोबाइल फोन व रोख १० हजार रुपये जप्त करण्यात आले. ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने “एलसीबी’चे पोलीस उपनिरीक्षक नीलेश शेळके, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, पो.ना. गजानन आहेर, संजय नागवे, विजय सोनोने, चालक पो.काँ. विजय मुंढे यांनी केली.