चिखलीतून मेडिकलवाल्याची मोटारसायकल लंपास!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः चिखली शहरातून आणखी एक मोटारसायकल चोरीस गेली आहे. मेडिकलचालक असलेले विनोद नागवाणी यांनी काल, २४ जुलैला या प्रकरणी तक्रार दिली. बसस्थानकाच्या मागील मोकळ्या जागेतून ही मोटारसायकल १८ जुलैला गायब झाली आहे. बराच शोध घेतल्यानंतर नागवाणी यांनी पोलीस ठाणे गाठले. विनोद नागवाणी सिंधी काॅलनीत राहतात. त्यांचे शहरात आनंद मेडिकल आहे. त्यांनी २०२० …
 
चिखलीतून मेडिकलवाल्याची मोटारसायकल लंपास!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः चिखली शहरातून आणखी एक मोटारसायकल चोरीस गेली आहे. मेडिकलचालक असलेले विनोद नागवाणी यांनी काल, २४ जुलैला या प्रकरणी तक्रार दिली. बसस्‍थानकाच्‍या मागील मोकळ्या जागेतून ही मोटारसायकल १८ जुलैला गायब झाली आहे. बराच शोध घेतल्यानंतर नागवाणी यांनी पोलीस ठाणे गाठले.

विनोद नागवाणी सिंधी काॅलनीत राहतात. त्‍यांचे शहरात आनंद मेडिकल आहे. त्‍यांनी २०२० मध्ये मोटारसायकल विकत घेतली होती. १८ जुलैला सकाळी साडेदहाच्‍या सुमारास ते बाजारात भाजीपाला आणण्यासाठी आले होते. बसस्‍थानकाच्‍या मोकळ्या जागेत मोटारसायकल (किंमत १० हजार) उभी करून ते बाजार करण्यासाठी गेले. दुपारी एकला ते बाजार करून मोटारसायकलकडे आले असता ती दिसली नाही. बसस्‍थानक व परिसरात शोध घेतला मात्र मोटारसायकल मिळून आली नहा. त्‍यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. तपास सुरू आहे.