चिखलीत उद्या महिलांची दुचाकी रॅली; कशासाठी ते वाचा…

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अयोद्ध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्मितीत सर्वांनी आपले योगदान द्यावे, यासाठी जनजागृती म्हणून 2 फेब्रुवारी रोजी चिखली शहरात महिलांच्या दुचाकी रॅलीचे आयोजन केले आहे.श्रीराम मंदिरातून दुपारी 2 वाजता निघणार्या या रॅलीचा संध्याकाळी 6 वाजता राजा टॉवर चौकात समारोप होणार आहे. चिखली शहर महिला सर्वांगीण समन्वय समितीतर्फे ही रॅली होणार आहे. दुचाकी रॅलीत …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अयोद्ध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्मितीत सर्वांनी आपले योगदान द्यावे, यासाठी जनजागृती म्हणून 2 फेब्रुवारी रोजी चिखली शहरात महिलांच्या दुचाकी रॅलीचे आयोजन केले आहे.
श्रीराम मंदिरातून दुपारी 2 वाजता निघणार्‍या या रॅलीचा संध्याकाळी 6 वाजता राजा टॉवर चौकात समारोप होणार आहे. चिखली शहर महिला सर्वांगीण समन्वय समितीतर्फे ही रॅली होणार आहे. दुचाकी रॅलीत महिला, युवतींनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी संग्रह समर्पण समितीने केले आहे.