चिखलीत कोरोनाचा स्फोट! 24 तासांत 180 पॉझिटिव्ह!! 4 तालुक्यांत ओलांडला 114 चा आकडा; 11 तालुक्यांतील धुमाकूळ कायम

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः बुधवारपाठोपाठ आज, 13 मे रोजी पुन्हा चार आकड्यांत कोरोना पॉझिटिव्ह आलेत. जिल्ह्यात 1060 रुग्ण निघाले असून, चिखली तालुक्यात कोरोणाचा स्फोट झाल्यासारखी स्थिती आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 180 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. याशिवाय 11 तालुक्यांतील कोविडचे थैमान कायम असल्याचे चित्र आहे. बुलडाणा तालुक्यातील कोरोनाचा मुक्काम कायम असून, 156 …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः  बुधवारपाठोपाठ आज, 13 मे रोजी पुन्हा चार आकड्यांत कोरोना पॉझिटिव्ह आलेत. जिल्ह्यात 1060 रुग्ण निघाले असून, चिखली तालुक्यात कोरोणाचा स्फोट झाल्यासारखी स्थिती आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 180 पॉझिटिव्ह रुग्ण  आढळले आहेत. याशिवाय 11 तालुक्यांतील कोविडचे थैमान कायम असल्याचे चित्र आहे.

बुलडाणा तालुक्यातील कोरोनाचा मुक्काम कायम असून, 156 रुग्णांसह तालुका आघाडीवर आहे. नांदुरा 135 व खामगाव तालुक्‍यात 114 रुग्‍ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. याशिवाय देऊळगाव राजा 81, मेहकर 78, सिंदखेडराजा 79 या तालुक्यांतील  कोरोनाचे चित्र अजून गंभीरच आहे. या तुलनेत मोताळा 44, जळगाव जामोद 47, मलकापूर 46, संग्रामपूर 46, शेगाव 31 आणि लोणार 23 तालुक्यांत किमान आजतरी  कोविड शांत आहे, असे म्हणता येईल. याशिवाय बळींची संख्याही कमी आहे. बुलडाणा महिला रुग्णालय व शेगाव सामान्य रुग्णालयातील प्रत्येकी एक पेशंट उपचारादरम्यान  दगावला.