चिखलीत घरासमोरच तिने सुरू केला ‘तो’ धंदा!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दिवसाढवळ्या घरासमोर बसून हातभट्टी दारू विकणाऱ्या महिलेला चिखली पोलिसांनी पकडले. तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई आज, 27 मार्चला सकाळी 9:30 च्या सुमारास करण्यात आली.जैनबबीद महेबुब पप्पूवाले (38, रा. गवळीपुरा चिखली) ही महिला हातभट्टी दारू विकत असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती.त्यांनी तिच्या घराकडे जाऊन पाहणी केली ती घरासमोरच रोडवर …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः दिवसाढवळ्या घरासमोर बसून हातभट्टी दारू विकणाऱ्या महिलेला चिखली पोलिसांनी पकडले. तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई आज, 27 मार्चला सकाळी 9:30 च्या सुमारास करण्यात आली.
जैनबबीद महेबुब पप्पूवाले (38, रा. गवळीपुरा चिखली) ही महिला हातभट्टी दारू विकत असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती.त्‍यांनी तिच्‍या घराकडे जाऊन पाहणी केली ती घरासमोरच रोडवर हातात प्लस्टिकची कॅन घेऊन दारू विकताना दिसली. महिला पोलीस कर्मचारी अनिता आराख यांनी कॅन ताब्यात घेत दारू जप्त केली.