चिखलीत ना नफा ना तोटा तत्‍वावर सामान्यांसाठी सुविधांयुक्‍त रुग्‍णवाहिका उपलब्‍ध

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लक्ष्मीनारायण चॅरिटेबल ट्रस्टतर्फे जिल्ह्यात प्रथमच ना नफा ना तोटा तत्वावर लक्ष्मीनारायण वैद्यकीय सहाय्यता उपकरण केंद्र व रुग्णांना तात्काळ वैद्यकिय सुविधा मिळण्यासाठी वातानुकुलित व ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिकेचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते ७ जूनला करण्यात आले. या वेळी आमदार सौ. श्वेताताई महाले, आमदार संजय गायकवाड, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, नगराध्यक्षा …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः लक्ष्मीनारायण चॅरिटेबल ट्रस्टतर्फे जिल्ह्यात प्रथमच ना नफा ना तोटा तत्वावर लक्ष्मीनारायण वैद्यकीय सहाय्यता उपकरण केंद्र व रुग्णांना तात्काळ वैद्यकिय सुविधा मिळण्यासाठी वातानुकुलित व ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिकेचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्‍या हस्‍ते ७ जूनला करण्यात आले.

या वेळी आमदार सौ. श्वेताताई महाले, आमदार संजय गायकवाड, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, नगराध्यक्षा सौ. प्रिया बोंद्रे, सौ. रेखा खेडेकर, चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष,सतीश गुप्‍ता, डॉ. प्रकाश शिंगणे, अजयकुमार कोठारी, ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. जयश्री राजेश चांडक, राजेश चांडक उपस्थित होते. चिखलीत रुग्णवाहिकेची आवश्यकता असल्यामुळे ट्रस्टने रुग्णवाहिकेचे लोकार्पण केले हे कौतुकास्पद आहे, असे यावेळी पालकमंत्री म्‍हणाले. प्रास्ताविक ट्रस्टचे सचिव डॉ. रजत चांडक यांनी केले. सूत्रसंचालन जयंत शर्मा यांनी केले. आभार विनोद नागवाणी यांनी केले.