चिखलीत युवक काँग्रेसचे विश्वासघात आंदोलन; इंधन दरवाढीविरोधात घोषणाबाजी

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ चिखली विधानसभा युवक काँग्रेसतर्फे पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ विश्वासघात आंदोलन आज, 17 फेब्रुवारीला दुपारी करण्यात आले. जयस्तंभ चैक पेट्रोल पंपाजवळ झालेल्या आंदोलनात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज कायंदे, विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब साळोख, राम डहाके, तालुकाध्यक्ष मनोज …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ चिखली विधानसभा युवक काँग्रेसतर्फे पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ विश्वासघात आंदोलन आज, 17 फेब्रुवारीला दुपारी करण्यात आले. जयस्तंभ चैक पेट्रोल पंपाजवळ झालेल्‍या आंदोलनात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज कायंदे, विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब साळोख, राम डहाके, तालुकाध्यक्ष मनोज लाहुडकार, राहुल सवडतकर, शहर काँग्रेस अध्यक्ष अतहर काझी, शुभम पडघान, सचिन बोंद्रे, राजू रज्जाक, तुषार भावसार, इसराक सौदागर, संजय गिरी, शिवा म्हस्के, शेख अजिम, बंडू कदम, शेख इलीयास, सोपान मानकर, गुलाब खान पठाण, आकाश साळवे, शेख आसिफ यांच्यासह अन्‍य कार्यकर्ते उपस्थित होते.