चिखली अर्बनच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी अयोद्ध्येतील राममंदिरासाठी उभा केला 24 लाखांचा निधी

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अयोध्येत होणार्या राममंदिरासाठी रामभक्तांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या सत्कार्यासाठी चिखली अर्बन परिवाराकडून 23 लाख 88 हजार रुपयांचा निधी समर्पित करण्यात आला आहे.देशातील प्रत्येक रामभक्त नागरिक, प्रत्येक संस्थेचे सदस्य भरभरून निधी देत आहेत. या राष्ट्रमंदिर उभारणीच्या कार्यात खारीचा वाटा असावा या हेतूने चिखली अर्बन परिवाराने बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांच्या …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अयोध्येत होणार्‍या राममंदिरासाठी रामभक्तांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या सत्कार्यासाठी चिखली अर्बन परिवाराकडून 23 लाख 88 हजार रुपयांचा निधी समर्पित करण्यात आला आहे.
देशातील प्रत्येक रामभक्त नागरिक, प्रत्येक संस्थेचे सदस्य भरभरून निधी देत आहेत. या राष्ट्रमंदिर उभारणीच्या कार्यात खारीचा वाटा असावा या हेतूने चिखली अर्बन परिवाराने बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांच्या संकल्पनेला हात दिला. बँकेचे संचालक, सल्लागार, कर्मचारी व हितचिंतकांनी एकत्र येऊन 23 लाख 88 हजारांच्या निधीचे संकलन केले. हा निधी जिल्हा व नगर निधी संकलन नियोजन समितीकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी भाजपचे माजी प्रदेश संघटन मंत्री प्रा. रवींद्र भुसारी यांच्यासह जिल्हा संघचालक तथा जिल्हा निधी संकलन समिती अध्यक्ष शांतीलाल बोराळकर, निधी संकलन अभियानाचे जिल्हा संयोजक अ‍ॅड. गजानन ठाकरे, नगर निधी संकलन अभियानाचे संयोजक अतुल श्रीवास्तव व अशोक अग्रवाल उपस्थित होते.