चिखली एमआयडीसी परिसरात तहसील पथकाचा छापा!

अवैधरित्या मुरुम उत्खनन सुरू होतेचिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली एमआयडीसी परिसरात अवैध मुरुम उत्खनन सुरू असताना नायब तहसीलदारांच्या पथकाने काल, 30 जूनला सकाळी पावणेनऊच्या सुमारास छापा मारला. जेसीबी आणि टिप्पर जप्त करण्यात आले आहे. नायब तहसीलदार डॉ. निकेतन भगवंतराव वाळे हे काल सकाळी तहसीलदारांच्या सूचनेप्रमाणे तलाठी विनोद गिरी व योगेश भुसारी यांच्यासह चिखली एमआयडीसी …
 
चिखली एमआयडीसी परिसरात तहसील पथकाचा छापा!

अवैधरित्या मुरुम उत्‍खनन सुरू होते
चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः चिखली एमआयडीसी परिसरात अवैध मुरुम उत्‍खनन सुरू असताना नायब तहसीलदारांच्‍या पथकाने काल, 30 जूनला सकाळी पावणेनऊच्‍या सुमारास छापा मारला. जेसीबी आणि टिप्पर जप्‍त करण्यात आले आहे.

नायब तहसीलदार डॉ. निकेतन भगवंतराव वाळे हे काल सकाळी तहसीलदारांच्‍या सूचनेप्रमाणे तलाठी विनोद गिरी व योगेश भुसारी यांच्‍यासह चिखली एमआयडीसी परिसरात गेले. कोठारी गोडावूनच्या मागे अवैध मुरुम उत्खनन सुरू असल्याचे त्‍यांना दिसले. या ठिकाणी सात ते आठ पिवळ्या रंगाचे टिप्पर व तीन JCB मशीनच्‍या साह्याने उत्खनन सुरू होते.

पथकाचे वाहन पाहताच टिप्पर व JCB यांनी त्या ठिकाणावरून पळ काढला. त्यावेळी त्यात एक पिवळ्या रंगाचे JCB (क्र. MH 28 AZ 3614) व एक पिवळ्या रंगाचे टिप्पर (क्र. MH 28 AB 7354) पळ काढताना आढळले. या जागेची पाहणी केली असता त्या ठिकाणी अंदाजे दोन ते तीन हजार ब्रास अवैध मुरुम उत्खनन केल्याचे व त्या ठिकाणचा मुरुम चोरून नेल्याचे दिसून आले. त्‍यामुळे डॉ. वाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी पळून गेलेल्या जेसीबी आणि टिप्परचालकाविरद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.