चिखली तहसीलच्‍या “त्‍या’ डेटा ऑपरेटर महिलेविरुद्ध अखेर गुन्‍हा दाखल

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ग्राम रोजगार सेवकाने राहत्या घरात बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २७ जुलैला कव्हळा (ता. चिखली) येथे समोर आली होती. २९ जुलैला आत्महत्या केलेल्या रामेश्वर ढोरे यांची पत्नी संगीता यांनी अमडापूर पोलीस ठाण्यात चिखली तहसील कार्यालयातील डेटा ऑपरेटर महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दिली होती. या तक्रारीची चौकशी करून काल, …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ग्राम रोजगार सेवकाने राहत्या घरात बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २७ जुलैला कव्हळा (ता. चिखली) येथे समोर आली होती. २९ जुलैला आत्‍महत्‍या केलेल्या रामेश्वर ढोरे यांची पत्नी संगीता यांनी अमडापूर पोलीस ठाण्यात चिखली तहसील कार्यालयातील डेटा ऑपरेटर महिलेविरुद्ध आत्‍महत्‍येस प्रवृत्त केल्याची तक्रार दिली होती. या तक्रारीची चौकशी करून काल, १ ऑगस्टला अमडापूर पोलिसांनी डेटा ऑपरेटर मनीषा लांगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रोजगार हमी योजना कक्षात मनिषा डांगे कार्यरत आहेत. त्‍यांनी रामेश्वर ढोरे यांना नेहमी अपमानास्पद वागणूक दिली. मस्टरवर सही करा नाही तर तुमचा रिपोर्ट करते, अशा धमकी दिल्या. धमक्‍यांना कंटाळून माझ्या पतीने आत्महत्या केली, अशी तक्रार संगिता ढोरे यांनी केली होती. ठाणेदार नागेशकुमार चतरकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली प्रकरणाचा तपास सुरू आहे.