चिखली तालुक्यातील चांधई, अंचरवाडी ग्रामपंचायत बिनविरोध

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः निवडणुकांमध्ये होणारा खर्च, खराब होणारी मने, यामुळे वाढणारा वैरभाव सोबत रिकामटेकड्या लोकांच्या उचापती, त्यामुळे खराब होणार्या ग्रामपंचायती यामुळे ग्रामपंचायती बिनविरोध करण्याचे आवाहन आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला चिखली तालुक्यात प्रतिसाद मिळाला असून, सर्व गावकर्यांनी एकत्र येऊन चांधई व अंचरवाडी ग्रामपंचायत बिनविरोध केली आहे. गावाने गावाच्या …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः निवडणुकांमध्ये होणारा खर्च, खराब होणारी मने, यामुळे वाढणारा वैरभाव सोबत रिकामटेकड्या लोकांच्या उचापती, त्यामुळे खराब होणार्‍या ग्रामपंचायती यामुळे ग्रामपंचायती बिनविरोध करण्याचे आवाहन आमदार सौ. श्‍वेताताई महाले पाटील यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला चिखली तालुक्यात प्रतिसाद मिळाला असून, सर्व गावकर्‍यांनी एकत्र येऊन चांधई व अंचरवाडी ग्रामपंचायत बिनविरोध केली आहे. गावाने गावाच्या विकासासाठी गाव बिनविरोध केले असेच म्हणावे लागेल.

चिखली तालुक्यातील चांधई येथे कृष्णा शालीकराम तेलंग्रे, सौ. स्वाती संदीप वानखेडे, सौ. सुनंदा परमेश्‍वर सोळंके, विशाल भाऊराव इंगळे, सौ. सविता सुरेश इंगळे, सौ. कोकिळा प्रतापसिंह सोळंके, सौ अनुसया दगडू सोळंके, सौ. पूजा अनिल गिरी, गणेश देवराव सवडतकर हे नऊ सदस्य अविरोध निवडून आले आहेत. या साठी गावातील माजी सरपंच मधुकर सोळंके, माजी सरपंच सुनील रंगड, रामसिंग सोळंके, शालीकराम दादा तेलंग्रे, निवृत्ती सोळंके, माधव सोळंके, किशोर जाधव, नागोराव इंगळे, अशोक इंगळे, ज्ञानदेव सोळंके, रतन कतोरे, गजानन सोळंके, संजय सोळंके, संजय गिरी, फुलसिंग सोळंके, अविनाश सवडतकर, बबन इंगळे, माजी सरपंच परमेश्‍वर सोळंके, जनार्धन सोळंके, पोलीस पाटील दलसिग सोळंके, दिगांबर कळमकर, किशोर सोळंके, रमेश सोळंके, आश्रुगिर गिरी, प्रताप सोळंके, प्रकाश इंगळे, बाळू सोळंके, ज्ञानेश्‍वर सोळंके, गणेश इंगळे, नागोराव इंगळे, अनिल इंगळे, विजय सोळंके, संजय जाधव, शिवदास सोळंके, राजू जाधव, सुनील इंगळे, लक्ष्मण सोनुने, अमोल इंगळे, देवानंद रगड, राजू इंगळे, विजय इंगळे यांनी प्रयत्न केले.

अंचरवाडीही बिनविरोध…

भरथंडीत ग्रामपंचायत राजकारणाने पेट घेतला असतानाच जिल्ह्यातल्या अंचरवाडी येथील गावकर्‍यांनी यंदाची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाला आहे. यापूर्वी 11 पैकी 9 सदस्यांची निवडणूक बिनविरोध झाली होती. परंतु 2 जागी अर्ज भरले गेल्याने 2 जागांसाठी निवडणूक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. अखेर आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दोघांनी माघार घेतल्याने 11 पैकी 11 सदस्यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे ही ग्रामपंचायत राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने मिळणार्‍या बक्षिसाचे मानकरी सुद्धा ठरणार आहे. विशेष म्हणजे गावकर्‍यांनी सरपंच म्हणून पंचायत समितीचे माजी उपसभापती समाधान परिहार आणि उपसरपंच म्हणून सुनील परिहार यांची घोषणा केली असली तरी सरपंचपदाचे आरक्षण हे निवडणुकीनंतर ठरणार असल्याने सरपंच निवडण्याचे सर्वाधिकार समाधान परिहार यांना देण्यात आले आहेत. अंचरवाडी हे गाव पालकमंत्री डॉ. शिंगणे यांच्या मतदारसंघात येत असल्याने बिनविरोध निवडणुकीबद्दल तुम्ही कुठल्या बक्षिसाची घोषणा करणार आहात का, असे विचारले असता ते म्हणाले की, इतर आमदारांप्रमाणे आपण कोणत्याही बक्षिसाची घोषणा करणार नाही. बक्षिसाची घोषणा करणे म्हणजे आमिष दाखवणे आहे. मात्र अंचरवाडीच्या विकासासाठी आपण निधीची कमतरता पडू देणार नाही, असे ते म्हणाले.