चिखली तालुक्यातील युवक खामगावातून गायब; आठ दिवसांनंतरही सापडेना!; आज ३ तरुणी बेपत्ता

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगावला बहिणीच्या घरी गेलेला युवक बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी खामगावच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात काल, २६ ऑगस्ट रोजी दिली. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत आज, २७ ऑगस्ट रोजी तीन तरुणी बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. बुलडाणा तालुक्यातील भादोला येथून ५५ वर्षीय विवाहितासुद्धा बेपत्ता झाली आहे. सोमठाणा (ता. चिखली) येथील युवक सतिश …
 
चिखली तालुक्यातील युवक खामगावातून गायब; आठ दिवसांनंतरही सापडेना!; आज ३ तरुणी बेपत्ता

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगावला बहिणीच्या घरी गेलेला युवक बेपत्ता झाल्याची तक्रार त्‍याच्या वडिलांनी खामगावच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात काल, २६ ऑगस्ट रोजी दिली. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत आज, २७ ऑगस्ट रोजी तीन तरुणी बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. बुलडाणा तालुक्यातील भादोला येथून ५५ वर्षीय विवाहितासुद्धा बेपत्ता झाली आहे.

सोमठाणा (ता. चिखली) येथील युवक सतिश अशोकराव ठाकरे (३१) हा वडिलांसोबत खामगाव येथील बहिणीकडे १८ ऑगस्ट रोजी गेला होता. त्यानंतर सतिशने वडिलांना सोमठाणा येथे पाठवून दिले व तो स्वतः तिथेच थांबला. संध्याकाळी मी गावी जातो असे सांगून तो मोटारसायकलीने निघाला. मात्र घरी पोहोचला नाही. त्याचा फोनही बंद येत होता. शेगाव, बाळापूर, अकोला येथे त्याचा शोध घेऊनही तो सापडला नाही म्हणून काल शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. दरम्‍यान, चिखलीतून आणखी एक तरुण बेपत्ता झाल्याचे वृत्त रात्री हाती आले असून, बबन तेजराव गालट असे या तरुणाचे नाव आहे. तो महाराणा प्रताप पुतळ्याजवळून बेपत्ता झाल्याची नोंद चिखली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

आज ३ तरुणी बेपत्ता झाल्याची नोंद
जयश्री सनिष काकडे(१९) ही तरुणी देऊळगाव राजा येथून बेपत्ता झाली. योगिता संतोष चोपडे(२०) ही सालीपुरा ,मलकापूर येथून बेपत्ता झाली. वर्षा विलास पांडे(१८) पिंपळगाव काळे येथून बेपत्ता झाली. बुलडाणा तालुक्यातील भादोला येथील सौ. मनिषा मुरलीधर इंगळे (५५) या भादोला येथून बेपत्ता झाल्याची नोंद बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.