चिखली नगरपरिषदेचे आरोग्‍य केंद्र उद्यापासून सेवेत

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ःचिखली नगर परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र उद्या, 1 जूनपासून जनतेच्या सेवेत रूजू होणार आहे. यासाठी आमदार श्वेताताई महाले यांनी पुढाकार घेऊन पाठपुरावा केला होता. या प्राथमिक आरोग्य केंद्रात 1 वैद्यकीय अधिकारी, 2 अधिपरिका, 5 आरोग्यसेविका, 1 प्रयोगशाळा तंत्रज्ञ, 1 शिपाई व 1 संगणक चालक अशी 12 जणांची टीम काम करणार आहे. …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ःचिखली नगर परिषदेचे प्राथमिक आरोग्‍य केंद्र उद्या, 1 जूनपासून जनतेच्‍या सेवेत रूजू होणार आहे. यासाठी आमदार श्वेताताई महाले यांनी पुढाकार घेऊन पाठपुरावा केला होता.

या प्राथमिक आरोग्‍य केंद्रात 1 वैद्यकीय अधिकारी, 2 अधिपरिका, 5 आरोग्‍यसेविका, 1 प्रयोगशाळा तंत्रज्ञ, 1 शिपाई व 1 संगणक चालक अशी 12 जणांची टीम काम करणार आहे. कोरोनाच्‍या संकटात सुरू होणाऱ्या या केंद्रामुळे चिखली शहरवासियांना वेळीच उपचार मिळण्यात मदत होणार आहे. याशिवाय सरकारचे विविध उपक्रम या केंद्रामार्फत राबवले जातील.