चिखली नगरपालिकेच्या गाळ्यातून होत होती अवैध गुटखा विक्री; एलसीबीने दोघांना पकडले; ५१ हजारांचा गुटखा पकडला

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : चिखली नगरपालिकेच्या गाळ्यातून अवैध गुटखा विक्रीचा धंदा चालविणाऱ्या दोघांना बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) रंगेहात पकडले. त्यांच्याकडून ५१ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. ही कारवाई आज, २३ ऑगस्ट रोजी सकाळी करण्यात आली. शेख इसरार शेख हाजी निसार (२०, रा. बागवान गल्ली चिखली), सादिक माजिद शहा(२०, रा. पंचायत समितीजवळ, चिखली) …
 
चिखली नगरपालिकेच्या गाळ्यातून होत होती अवैध गुटखा विक्री; एलसीबीने दोघांना पकडले; ५१ हजारांचा गुटखा पकडला

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : चिखली नगरपालिकेच्या गाळ्यातून अवैध गुटखा विक्रीचा धंदा चालविणाऱ्या दोघांना बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेने (एलसीबी) रंगेहात पकडले. त्यांच्याकडून ५१ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. ही कारवाई आज, २३ ऑगस्ट रोजी सकाळी करण्यात आली. शेख इसरार शेख हाजी निसार (२०, रा. बागवान गल्ली चिखली), सादिक माजिद शहा(२०, रा. पंचायत समितीजवळ, चिखली) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.

चिखली शहरातील बाबू लॉज चौकात नगरपरिषदेने गाळे बांधून व्यवसायिकांना भाडेतत्वावर दिले आहेत. त्यातील एका गाळ्यात अवैध गुटखा विक्री सुरू असल्याची माहिती “एलसीबी’ पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून छापा मारला असता दोघे गुटखा विक्री करताना आढळले. त्‍यांना ताब्यात घेत ५१ हजार १९० रुपयांचा गुटखा जप्‍त करण्यात आला. त्‍यांना चिखली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने एलसीबीचे सहायक पोलीस निरिक्षक विजय मोरे, पोहेकाँ शेख नदीम, चिखली पोलीस ठाण्याचे पोहेकाँ पुरुषोत्तम आघाव, उमेश राजपूत यांनी पार पाडली.