चिखली येथे हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा PSA प्लांट बसवा ः आमदार श्वेताताई महाले पाटील यांची मागणी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील काही तालुक्यांत हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा PSA प्लांट बसविला जात आहे. यातून चिखली ग्रामीण रुग्णालय वगळले आहे. चिखली ग्रामीण रुग्णालयाची दर्जावाढ होऊन उपजिल्हा रुग्णालय झालेले आहे. तसेच चिखली येथे समर्पित कोविड हेल्थ सेन्टरलासुद्धा मान्यता मिळून ते लवकरच सुरू होत आहे. शिवाय चिखली येथे ट्रामा केअर सेंटरसुद्धा होणार असून, दर्जावाढ …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील काही तालुक्यांत हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा PSA प्लांट बसविला जात आहे. यातून चिखली ग्रामीण रुग्णालय वगळले आहे. चिखली ग्रामीण रुग्णालयाची दर्जावाढ होऊन उपजिल्हा रुग्णालय झालेले आहे. तसेच चिखली येथे समर्पित कोविड हेल्थ सेन्टरलासुद्धा मान्यता मिळून ते लवकरच सुरू होत आहे. शिवाय चिखली येथे ट्रामा केअर सेंटरसुद्धा होणार असून, दर्जावाढ झालेले उपजिल्हा रुग्णालय 50 ऐवजी 100 खाटांचे होणे प्रस्तावित आहे. त्यामुळे चिखली येथे ऑक्सिजनची नितांत आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे चिखली येथे हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे PSA प्लांट बसविण्यात यावा, अशी मागणी आ सौ श्वेताताई महाले पाटील यांनी कोरोनाविषयक आढावा बैठकीत आज, 9 मे रोजी केली.

स्‍त्री रुग्णालयात व्हेंटिलेटर बेड वाढविण्याची मागणीही यावेळी आमदार सौ. महाले पाटील यांनी केली. बुलडाणा येथील स्‍त्री रुग्णालयात 26 व्हेंटिलेटर बेड उपलब्ध आहेत. आता पुन्हा नव्याने 4 बेड वाढविण्यात आल्याने एकूण संख्या 30 झालेली आहे. परंतु ही संख्या सुद्धा खूप अपुरी असून भविष्यात वाढणारी रुग्णसंख्या आणि तिसऱ्या लाटेची तज्‍ज्ञांनी वर्तविलेली शक्यता यामुळे जिल्ह्यात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड मोठ्या प्रमाणावर वाढविण्याची गरज पडणार आहे, असे त्‍या म्‍हणाल्या.

लहान मुलांसाठी सुध्दा NICU तयार ठेवा

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाची बाधा होणार असल्याची देखील शक्यता सांगितली जात आहे. आताच 1 ते 10 वर्षांच्या मुलांना कोरोनाची लागण झालेली आहे. लहान मुलांना सुद्धा व्हेंटिलेटरची गरज पडणार आहे. वेळेवर, जीव गेल्यावर व्यवस्था करण्याऐवजी आतापासूनच तशी व्यवस्था करण्याची नितांत आवश्यकता असल्याची गरज देखील आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी त्यांच्या मागणीतून अधोरेखित केली आहे.

रेमडेसिवीरचे दुष्परिणाम जनतेसमोर मांडा

गरज नसताना रेमडेसिवीर इंजेक्शन सर्रासपणे कोरोना रुग्णांना दिले जात आहे. रेमडेसिवीर हे कोरोनाच्या उपचारासाठी लागू नाही हे who ने सुद्धा सांगितले आहे. त्यातच रेमडेसिवीरचे घातक दुष्परिणाम आता समोर येत असून, विविध आजार होत असून रेमडेसिवीरचे दुष्परिणाम जनतेसमोर आणण्यासाठी सुद्धा उपाययोजना करण्याची मागणी आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी यावेळी केली.