चिखली, लोणारमध्ये महावितरण कार्यालयावर भाजपचा हल्लाबोल!

चिखली/लोणार (कृष्णा सपकाळ / प्रेमसिंगी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लॉकडाऊन काळात वाढवून दिलेली वीज बिले कमी केल्याशिवाय न भरण्याचे आवाहन करत आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी केले. भव्य मोटारसायकल रॅली काढून वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर भारतीय जनता पक्षाने हल्लाबोल करून आमदार सौ. श्वेताताई महाले यांच्या हस्ते कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले. काल, 5 फेब्रुवारीला …
 

चिखली/लोणार (कृष्णा सपकाळ / प्रेमसिंगी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लॉकडाऊन काळात वाढवून दिलेली वीज बिले कमी केल्याशिवाय न भरण्याचे आवाहन करत आमदार सौ. श्‍वेताताई महाले यांनी केले. भव्य मोटारसायकल रॅली काढून वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर भारतीय जनता पक्षाने हल्लाबोल करून आमदार सौ. श्‍वेताताई महाले यांच्या हस्ते कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले. काल, 5 फेब्रुवारीला हे आंदोलन झाले.
सकाळी 11 वाजता खामगाव चौफुली येथून मोटारसायकल रॅलीला सुरुवात होऊन बस स्टँडसमोरून छत्रपती शिवाजी महाराज चौक तेथून जयस्तंभ चौक, राजा टॉवररोडने बैलगाडी चौक, चिंच परिसरातून जुना गाव येथून महावितरण कार्यालयावर हल्लाबोल करण्यात आला. यावेळी महाआघाडी सरकार आणि महावितरणच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात यावेळी  पंडितदादा देशमुख (शहराध्यक्ष), डॉ. कृष्णकुमार सपकाळ (तालुकाध्यक्ष), जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह राजपूत, नगराध्यक्षा प्रियाताई बोंद्रे, ज्येष्ठ नेते रामदास देव्हडे, मंगेश व्यवहारे, सभापती सौ. सिंधूताई तायडे, उपनगराध्यक्षा वजीरा बी शेख अनिस, उपसभापती शमशाद बी पटेल, महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ. व्दारकाबाई भोसले, नगरसेवक सुभाष अप्पा मंगरूळकर, शेख अनिस शेख बुढन, प्रा. राजू गवई, बंडूभाऊ कुलकर्णी, अनुप महाजन, शैलेश बाहेती सुदर्शन खरात, गोविंद देव्हडे, नामु गुरुदासानी, विजय नकवाल, संजय आतार, दिलीप शेठ डागा, संजय महाले, जितेंद्र कलंत्री, अ‍ॅड. सदार, प्राध्यापक वीरेंद्र वानखेडे, बाळासाहेब हाडगे, पंजाबराव धनवे, अनमोल ढोरे, संजय आतर, विजय खरे, शैलेश सोनुने, बळीराम सपकाळ, रमेश सोळंकी, भगवान सोळुंके, विजय देशमाने, गजू परिहार, श्याम पाटील, किशोर जामदार, सुमंता  मोरे, गजानन सोळंके, गुणवंतराव देशमुख, बबनराव राऊत, अरुण पाटील, नितीन पाटील, शाहिद पटेल, विठ्ठल परिहार, अमोल परिहार, बंडू अंभोरे, बद्री पानगोळे, संजय पुरी, चेतन देशमुख, संतोष काळे, गजानन परिहार, अंकुशराव तायडे, राम शेळके, गोपाळ शेळके, विकी शेळके, विशाल बोरकर, संकेत सोळंकी, शिवा जाधव, वैभव तायडे,  नंदकुमार जुमडे, ज्ञानेश्‍वर देशमुख, नरेश मोरवाल, अक्षय झालटे, रवींद्र मोरे, रवींद्र सवडे, विशाल तायडे, सागर घाटगे, मंगेश पांढरे, सागर गवई, संतोष अग्रवाल, सोनू शेळके, गजेंद्र मस्के अरुण सोनुने, सचिन गरड, संतोष जराड, सोनू सपकाळ, राजू राठी, संतोष काळे, भारत दानवे, रमेश यंगड, माऊली दुधाळे, रमेश देडे, प्रशांत पाखरे, राम देशमुख, संजय पुरी, बद्रीनाथ पानगोळे,  बंडूभाऊ अंभोरे, शिवशंकर सुरडकर, शंकर देशमाने, दत्ता खंडेलवाल, युवराज भुसारी, श्यामभाऊ हांडगे, कृष्णा साळुंखे, यश टीपारे, योगेश राजपूत, संदीप लोखंडे, सागर पुरोहित, संदीप सोळुंके, सचिन शेटे, दीपक भाकडे , जगन्नाथ वाघ, सचिन शेटे, चेतन देशमुख, अमोल परिहार, निरज गायकवाड, सचिन कोकाटे, तिवारी सर, भीमराव अंभोरे, अशोक हातगळे, विनोद वानखेडे, दीपक झाडे, देविदास जाधव, हेमंत पारखेडे, गजानन दुधाळे,  मुरलीधर लाड, गजानन कोळी, नीलेश घनमोडे , ऋषिकेश घोडे , अनंत सोळंकी आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
लोणारमध्येही आंदोलन


लोणारमध्ये महावितरणच्या कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करून कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले. अधिकार्‍यांना वाढीव बिलांबद्दल जाब विचारण्यात आला. आंदोलनात भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी बाबाराव मुंडे, तालुकाध्यक्ष गजानन मापारी, शहराध्यक्ष भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाराज मुंढे, विजूभाऊ मापारी, मारुतराव सुरसे, प्रकाश नागरे, गणेश तांगडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष  उद्धव  आटोळे, वैभव नागरे, अंकुश तिजोरे, अजीम चौधरी, दीपक चौधरी, प्रल्हाद दराडे, किशोर मादनकर, प्रल्हाद मोरे, गुलाब नाना भानापुरे, सुकलाल सरसरे, मनोहर पडघान, महिला आघाडी अध्यक्ष शीलाबाई खाडे, लक्ष्मीबाई टेकाळे, राधाबाई धारकर, रूपाली धारकर, बबीता खंदारे, द्वारकाबाई अंभोरे, चंद्रकला वानखेडे, इंदू पाटोळे आदींचा सहभाग होता.