चितोड्यात दोन गटांत धुमश्चक्री; गावात पोलीस फौजफाटा तैनात

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चितोडा (ता. खामगाव) येथे आज, 19 जूनला सकाळी दोन गटांत तुफान हाणामारी झाली. यात 1 जण गंभीर जखमी झाल, तर अन्य 2 जण जखमी झाले. गंभीर जखमी रमेश गौतम हिवराळे (35, रा. चितोडा) याला अकोला येथे हलविण्यात आले आहे. चितोडा येथील वाघ आणि हिवराळे कुटुंबात जुन्या कारणावरून वाद झाला. दोन्ही …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः चितोडा (ता. खामगाव) येथे आज, 19 जूनला सकाळी दोन गटांत तुफान हाणामारी झाली. यात 1 जण गंभीर जखमी झाल, तर अन्य 2 जण जखमी झाले. गंभीर जखमी रमेश गौतम हिवराळे (35, रा. चितोडा) याला अकोला येथे हलविण्यात आले आहे.

चितोडा येथील वाघ आणि हिवराळे कुटुंबात जुन्या कारणावरून वाद झाला. दोन्ही कुटुंबातील सदस्य समोरासमोर आल्याने हाणामारी व जाळपोळ झाली. खामगाव ग्रामीण पोलिसांचा फौजफाटा गावात पोहोचला. सध्या ठाणेदारांसह पोलीस कर्मचारी गावात तळ ठोकून आहेत. गंभीर जखमी रमेश हिवराळे याला उपचाराकरिता अकोला येथे हलविण्यात आले असून, अन्य दोघांना खामगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वृत्त लिहीपर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.