चिमुकला घराबाहेर रडत होता.. शेजारच्यांनी घरात बघितले अन् धक्काच बसला..!

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 40 वर्षीय महिलेने राहत्या घरात टिनपत्र्याच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना खामगाव तालुक्यातील पारखेड येथे आज, 11 फेब्रुवारीला सव्वा बाराच्या सुमारास घडली.संगीता पुंडलिक पुराणे (रा. पारखेड, ता. खामगाव) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.संगीताचे पती पुंडलिक मजुरीसाठी गेले होते. यावेळी त्यांचा 6 वर्षांचा मुलगा …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 40 वर्षीय महिलेने राहत्या घरात टिनपत्र्याच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना खामगाव तालुक्यातील पारखेड येथे आज, 11 फेब्रुवारीला सव्वा बाराच्या सुमारास घडली.
संगीता पुंडलिक पुराणे (रा. पारखेड, ता. खामगाव) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
संगीताचे पती पुंडलिक मजुरीसाठी गेले होते. यावेळी त्यांचा 6 वर्षांचा मुलगा व पत्नी दोघेच घरी होते. दरम्यान सव्वा बाराच्या सुमारास हा चिमुकला घराबाहेर रडत उभा असल्याचे शेजार्‍यांना दिसले. घर आतून लावलेले असल्याने शेजारच्यांची घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता संगीता यांनी साडीने गळफास घेतल्याचे दिसून आले. याप्रकरणी मृतक महिलेचे दीर सुनिल पांडुरंग पुराणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.