चोरटे उदंड… मोताळ्यात शाळा फोडून टीव्‍हीची चोरी; मलकापुरातून दुचाकीची चोरी

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हा परिषदेची शाळा फोडून चोरट्यांनी 32 इंची एलईडी टीव्ही लांबवल्याची घटना पोफळी (ता. मोताळा) येथे 3 मेच्या सकाळी समोर आली. मुख्याध्यापक पुंजाजी डिगांबर जावळे (57) यांनी दिलेल्या तक्रारीवरून धामणगाव बढे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 30 एप्रिलच्या सायंकाळी 5 ला मुख्याध्यापक जावळे व त्यांचे सहकारी शिक्षक भास्कर बोराडे शाळेचे कामकाज …
 

मोताळा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्हा परिषदेची शाळा फोडून चोरट्यांनी 32 इंची एलईडी टीव्‍ही लांबवल्याची घटना पोफळी (ता. मोताळा) येथे 3 मेच्‍या सकाळी समोर आली. मुख्याध्यापक पुंजाजी डिगांबर जावळे (57) यांनी दिलेल्या तक्रारीवरून धामणगाव बढे पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.

30 एप्रिलच्‍या सायंकाळी 5 ला मुख्याध्यापक जावळे व त्यांचे सहकारी शिक्षक भास्कर बोराडे शाळेचे कामकाज आटोपून शाळा बंद करून निघून गेले होते.  3 मेच्‍या सकाळी  8 वाजता सहकारी शिक्षकांसह ते शाळेवर आले असता कार्यालयाच्‍या बाजूची खोली उघडी दिसली. आतमध्ये जाऊन पाहिले असता एलइडी 32 इंची टीव्ही (किमत 16 हजार रुपये) गायब दिसला. तपास एएसआय मोहनसिंह राजपूत करत आहेत.

मलकापुरात दुचाकीची चोरी

जयंता वसंता कोदणकर (रा. हेडगेवारनगर, मलकापूर) सेल टॅक्स, GST चे काम करतात. 23 एप्रिलला त्यांची मोटारसायकल (क्र. MH-28 AM 6178, किंमत 20,000) घरासमोर उभी केलेली असताना रात्रीतून कुणीतरी चोरून नेली. शोध घेऊनही आजपर्यंत ती मिळाली नाही. अखेर कोदणकर यांनी मलकापूर शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्‍यावरून चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. तपास NPC अमोल शेले करत आहेत.