चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच… बुलडाण्यात अडीच लाखांची घरफोडी!

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. काल, 6 फेब्रुवारीलाही रात्री अकराच्या सुमारास मोठी घरफोडी झाल्याचे समोर आले. घरी कुणी नसल्याचे साधत एकतानगरातील घर फोडून अडीच लाख रुपये लंपास करण्यात आले आहेत.नीलेश विजय गवळी (रा. एकतानगर, बुलडाणा) हे काल सकाळी 8 वाजता घराबाहेर पडले. त्यांची पत्नी औरंगाबादला गेली होती. …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. काल, 6 फेब्रुवारीलाही रात्री अकराच्या सुमारास मोठी घरफोडी झाल्याचे समोर आले. घरी कुणी नसल्याचे साधत एकतानगरातील घर फोडून अडीच लाख रुपये लंपास करण्यात आले आहेत.
नीलेश विजय गवळी (रा. एकतानगर, बुलडाणा) हे काल सकाळी 8 वाजता घराबाहेर पडले. त्यांची पत्नी औरंगाबादला गेली होती. दरम्यान नीलेश गवळी हे काल रात्री 11 वाजता घरी परतले असता घरफोडी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घराच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील अडीच लाख रुपये चोरले आहेत. नीलेश गवळी यांनी लगेच पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यावर एपीआय अभिजित अहिरराव यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.