चोरट्यांचा सोयाबीनवर डल्ला; 6 कट्टे चोरले; तांदुळवाडी येथील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः बुलडाणा शहरात चोरीचे सत्र सुरू असतानाच आता ग्रामीण भागातही चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. तालुक्यातील तांदुळवाडी येथून सोयाबीनचे 6 कट्टे चोरट्यांनी लांबवले. ही घटना आज, 22 फेब्रुवारीला पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भागवत अशोक रिंढे (35, रा. तांदूळवाडी, ता. बुलडाणा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः बुलडाणा शहरात चोरीचे सत्र सुरू असतानाच आता ग्रामीण भागातही चोरट्यांनी उच्‍छाद मांडला आहे. तालुक्यातील तांदुळवाडी येथून सोयाबीनचे 6 कट्टे चोरट्यांनी लांबवले. ही घटना आज, 22 फेब्रुवारीला पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भागवत अशोक रिंढे (35, रा. तांदूळवाडी, ता. बुलडाणा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आज सकाळी त्यांची आई सडा टाकण्यासाठी उठली असता व्हरांड्यात ठेवलेल्या सोयाबीनच्या 10 कट्यांपैकी 6 कट्टे(किंमत 16 हजार रुपये) गायब झालेले दिसले. 21 फेब्रुवारीच्‍या रात्री ते 22 फेब्रुवारीच्‍या सकाळी 5 वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी ते चोरी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तपास ठाणेदार सारंग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ. शेख राजिक करीत आहेत.