चोरट्यांचा हैदोस सुरूच… खामगावात घर फोडून ९१ हजारांची चोरी, नांदुऱ्यात तिघे श्रध्दा ज्वेलर्सचे शटर फोडताना सीसीटीव्‍हीत कैद!

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव शहरातील पुष्पकनगरात घर फोडून चोरट्यांनी दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना २ ऑगस्टला दुपारी घडली. खामगाव शहर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घरातील सर्व जण अंत्यसंस्कारासाठी गावी गेल्याने चोरट्यांनी संधी साधली. या प्रकरणी धीरज अरुण करांगळे (रा. पुष्पकनगर शेगाव रोड …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव शहरातील पुष्पकनगरात घर फोडून चोरट्यांनी दागिन्यांसह रोख रक्‍कम असा एकूण ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना २ ऑगस्‍टला दुपारी घडली. खामगाव शहर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. घरातील सर्व जण अंत्‍यसंस्‍कारासाठी गावी गेल्याने चोरट्यांनी संधी साधली.

या प्रकरणी धीरज अरुण करांगळे (रा. पुष्पकनगर शेगाव रोड खामगाव) या तरुणाने तक्रार दिली. तिंत्रव येथील त्‍याची मोठी आई शालू करांगळे या मरण पावल्याने अंत्यविधीसाठी त्‍याचे वडील अरुण करांगळे, आई ललिता करांगळे, भाऊ ओम, बहीण पूजा असे सर्व जण पुष्पकनगरातील घराला कुलूप लावून तिंत्रवला गेले होते.

अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्वजण संध्याकाळी साडेपाचला घरी आले असता हाॅलच्‍या दरवाजाचा कडीकोयंडा वाकवून तुटलेला दिसला. बेडरुममधील कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कपाटातील सोन्याचे दागिने दिसून आले नाहीत. यात २२ हजार २८८ रुपयांचे सोन्याचे डोरले, २४ हजार ५९८ रुपयांचे सोन्याचे मनी, १९ हजार ४५३ रुपयांचे सोन्याचे टाॅप्‍स,नगदी २५ हजार रुपये असा एकूण ९१ हजार ३३९ रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवल्याचे दिसून आले.

नांदुऱ्यात चोरीचा प्रयत्‍न
कैलास नारायण वर्मा यांचे धनगरपुऱ्यात श्रध्दा ज्वेलर्स आहे. त्‍यांच्‍या दुकानावर ५ सीसीटीव्‍ही कॅमेरे बसवलेले आहेत. २ ऑगस्‍टला सकाळी ११ वाजता त्‍यांना सीसीटिव्ही कॅमेरा लटकलेला दिसला. सीसीटीव्‍ही फुटेज पाहिले असता मध्यरात्री अडीचला तीन चोरटे शटर वाकवताना दिसले. त्‍यांनी सीसीटिव्ही कॅमेराही फोडला.