चोरट्यांची हिंमत तर पहा… पोलिसाचीच गाडी लांबवली!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेहकरमध्ये सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरावर दरोडा टाकल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक धाडसी चोरीची घटना समोर आली. चक्क पोलीस कर्मचार्याच्या घराच्या गेटचे कुलूप तोडून त्यांची हिरो होंडा पॅशन मोटारसायकल चोरट्यांनी लांबवली. ही घटना काल, 6 फेब्रुवारीला सकाळी व्यंकटेश पुरमनगरात समोर आली. पोलीस कर्मचारी अतुल पवार यांची दुचाकी चोरीस गेली आहे. याप्रकरणी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेहकरमध्ये सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरावर दरोडा टाकल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक धाडसी चोरीची घटना समोर आली. चक्क पोलीस कर्मचार्‍याच्या घराच्या गेटचे कुलूप तोडून त्यांची हिरो होंडा पॅशन मोटारसायकल चोरट्यांनी लांबवली. ही घटना काल, 6 फेब्रुवारीला सकाळी व्यंकटेश पुरमनगरात समोर आली. पोलीस कर्मचारी अतुल पवार यांची दुचाकी चोरीस गेली आहे. याप्रकरणी मेहकर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.