चोरट्यांनी पुन्‍हा डोके वर काढले; बुलडाणा शहरात घर फोडले, लग्‍नाहून परतलेल्या गुप्‍तांनी मारला डोक्यावर हात!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या काही दिवसांत शांत बसलेल्या चोरट्यांनी डोके वर काढल्याचे आज, 20 एप्रिलला समोर आले. तानाजीनगरात घर फोडून त्यांनी 20 हजार रुपये नगदी व 46 हजारांचे दागिने लंपास केले आहेत. शैलेश गुप्ता यांच्या घरात ही चोरी झाली आहे. ते 18 एप्रिलला परिवारासह अकोट येथे लग्नाकरिता गेले होते. आज दुपारी 12 वाजता …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः गेल्या काही दिवसांत शांत बसलेल्या चोरट्यांनी डोके वर काढल्‍याचे  आज, 20 एप्रिलला समोर आले. तानाजीनगरात घर फोडून त्‍यांनी 20 हजार रुपये नगदी व 46 हजारांचे दागिने लंपास केले आहेत.

शैलेश गुप्ता यांच्या घरात ही चोरी झाली आहे. ते 18 एप्रिलला परिवारासह अकोट येथे लग्नाकरिता गेले होते. आज दुपारी 12 वाजता ते परतले असता त्यांना घराच्या दरवाजाची कडी तुटलेली दिसली. घरात जाऊन बघितले असता बेडरूममधील कपाटात ठेवलेले रोख 20 हजार व 46 हजार रुपयांचे दागिने चोरीला गेल्याचे दिसले. याप्रकरणी त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.