चोरट्यांनी मारला मोठा हात; खामगाव शहरातील घटनेने तुम्‍हीही म्‍हणाल, बाप्पा जरा अतिच झालंय…

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात वाढत्या चोऱ्या सध्या चर्चेचा विषय असतानाच लहान मोठ्या चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांनी आता चक्क उभा ट्रकच गायब केला. ही घटना खामगाव शहरात आज, 25 फेब्रुवारीला समोर आली.महेश रामगोपाल शर्मा यांनी त्यांचा ट्रक शाबीर शहा (रा. मेहबूबनगर खामगाव) यांना भाड्याने दिला होता. शहा हे 16 फेब्रुवारी रोजी ट्रक (क्र. एमएच 31 …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात वाढत्‍या चोऱ्या सध्या चर्चेचा विषय असतानाच लहान मोठ्या चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांनी आता चक्क उभा ट्रकच गायब केला. ही घटना खामगाव शहरात आज, 25 फेब्रुवारीला समोर आली.
महेश रामगोपाल शर्मा यांनी त्यांचा ट्रक शाबीर शहा (रा. मेहबूबनगर खामगाव) यांना भाड्याने दिला होता. शहा हे 16 फेब्रुवारी रोजी ट्रक (क्र. एमएच 31 एपी 56) घरासमोर उभा करून सहपरिवार बाहेरगावी गेले होते. 18 फेब्रुवारी रोजी ते गावावरून परत आले असता त्यांना ट्रक गायब झाल्याचे दिसले. सर्वत्र शोधाशोध करूनही त्यांचा ट्रक सापडला नाही. त्‍यामुळे ट्रकमालक महेश शर्मा यांनी आज खामगाव शहर पोलीस ठाण्यात ट्रक चोरी झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.