चोरांनी हद्द केली बुवा… ८ शेतकऱ्यांचे ८४ स्प्रिंकलर नेले चाेरून!; चिखली तालुक्‍यातील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळगाव घुबे (ता. चिखली) येथील ६ व कोनड येथील २ अशा ८ शेतकऱ्यांचे ८४ स्प्रिंकलर चोरीला गेल्याची घटना आज, १४ सप्टेंबर रोजी उघडकीस आली आहे. मागील वर्षीसुद्धा देऊळगाव घुबे येथील शेतकऱ्यांचे ५०० स्प्रिंकलर चोरीला गेल्याची घटना घडली होती. ठिबक सिंचनासाठी वापरलेल्या स्प्रिंकलरच्या स्प्रिंगला मोठी किंमत असते. त्यामुळे शेतीतील स्प्रिंकलर चोरीच्या …
 
चोरांनी हद्द केली बुवा… ८ शेतकऱ्यांचे ८४ स्प्रिंकलर नेले चाेरून!; चिखली तालुक्‍यातील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळगाव घुबे (ता. चिखली) येथील ६ व कोनड येथील २ अशा ८ शेतकऱ्यांचे ८४ स्प्रिंकलर चोरीला गेल्याची घटना आज, १४ सप्टेंबर रोजी उघडकीस आली आहे.

मागील वर्षीसुद्धा देऊळगाव घुबे येथील शेतकऱ्यांचे ५०० स्प्रिंकलर चोरीला गेल्याची घटना घडली होती. ठिबक सिंचनासाठी वापरलेल्या स्प्रिंकलरच्या स्प्रिंगला मोठी किंमत असते. त्‍यामुळे शेतीतील स्प्रिंकलर चोरीच्या घटना घडतात. देऊळगाव घुबे येथील शेतकरी गजानन घुबे यांच्‍या शेतातून १०, विजय घुबे यांच्‍या १२, नारायण कोकाटे यांच्‍या १०, ज्ञानेश्वर गोरे यांच्‍या १०, रामेश्वर गोरे यांच्‍या १०, भालचंद्र घुबे यांच्‍या १०, कोकाटे यांच्‍या ४ व देऊळगाव घुबे शेजारील कोनड २ येथील शेतकऱ्यांचे २१ असे एकूण ८४ स्प्रिंकलर अंदाजे किंमत १ लाख रुपये चोरीला गेले आहेत. याप्रकरणाची तक्रार शेतकऱ्यांनी अंढेरा पोलीस ठाण्यात दिली आहे.